नाशिक : प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचा सण अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ झळाळली आहे. आकाशकंदील, कपडे, पणत्या, विविध आकारांचे दिवे, फराळाचे पदार्थ अशा अनेक बाबींनी दुकाने सजल्याचे चित्र आहे. दिवाळीत फटाक्यांबरोबरच खरेदीचाही बार उडतो. यंदा दिवाळीची चाहूल विके्रत्यांप्रमाणेच ग्राहकांनाही लवकर लागली असल्याचे चित्र आहे. दिवाळीला पंधरा दिवस शिल्लक असले तरी लगबग दिसून येत आहे.सोन्या-चांदीची खरेदी सध्या सोन्याचे दागिने, लक्ष्मी, गणपती व सरस्वतीचे शिक्के असलेल्या नाण्यांना चांगली मागणी असल्याचे सराफांनी सांगितले. लक्ष्मीपूजनाला या नाण्यांच्या पूजनाचे महत्त्व असल्याने ते खरेदी करण्यावर भर दिला जातो. चांदीच्या गणपती व लक्ष्मीमूर्तीही खरेदी केल्या जात आहेत.
बाजारपेठ झळाळली
By admin | Published: October 10, 2014 1:37 AM