मालेगावी विवाहितेवर सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:02 AM2018-03-08T02:02:37+5:302018-03-08T02:02:37+5:30
आझादनगर : मालेगावी रमजानपुरा भागात सोमवारी सायंकाळी चौघा नराधमांनी रस्त्यात अडवून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून, शहर पोलिसांनी एकास अटक केली तर तीन जण फरार झाले.
आझादनगर : मालेगावी रमजानपुरा भागात सोमवारी सायंकाळी चौघा नराधमांनी रस्त्यात अडवून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून, शहर पोलिसांनी एकास अटक केली तर तीन जण फरार झाले.
पीडित महिला मेहुण्याबरोबर उपचारासाठी सामान्य रुग्णालयात जात असताना चौघांनी तिला रस्त्यात अडवून रमजानपुरा भागात जबरदस्तीने नेऊन खंडणीची मागणी केली. तसेच सामूहिक अत्याचार करून दुचाकी व मोबाइल घेऊन फरार झाले. पोलिसांनी आरोपी माजीद एकबाल अहमद कुरैशी यास अटक केली, तर तीनजण फरार आहेत. फरार तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास १९ वर्षीय पीडित विवाहिता मेहुण्याबरोबर उपचारासाठी दुचाकीने सामान्य रुग्णालयात जात होती. आरोपींनी दुचाकी अडवून बसस्थानकाकडे घेण्यास सांगितले. बसस्थानक येथे संशयित आरोपी माजीद व त्याच्या मित्राने पीडितेस दुचाकीवर बसवून, तर मेहुण्यास उर्वरित दोघांनी दुचाकीवर बसवून रमजानपुरा भागातील बोरीचा मळा येथे नेले. तेथे २० हजाराची खंडणी मागितली; परंतु २० हजार रुपये देण्यास नकार दिल्याने पीडितेच्या मेहुण्यास मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. संगनमत करून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या मेहुण्याची दुचाकी व भ्रमणध्वनी हिसकावून घेतला, अशी फिर्याद पीडित महिलेने दिली.