रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मॉकड्रील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:19 PM2020-01-13T13:19:09+5:302020-01-13T13:19:16+5:30
इगतपुरी :- घोटी येथील टोल नाक्यावरवाहतूक महामार्ग घोटी टँबच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहनिम्मित मॉकडीÑलचे आयोजन करण्यात आले होते.
इगतपुरी :- घोटी येथील टोल नाक्यावरवाहतूक महामार्ग घोटी टँबच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहनिम्मित मॉकडीÑलचे आयोजन करण्यात आले होते.आग लागलेल्या गॅस टँकर मधील वाहक चालक यांना सुखरूप बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवतात. पाहणा-यांची गर्दी काळजाला थक्क करणारे..जीवाची बाजी लावतांनाचा थरारक क्षण नागरिकांना वाहतूक सप्ताह निमित्ताने पाह्यला मिळाला. केंद्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक सप्ताहानिमित्ताने जिल्हा महामार्ग वाहतुक पोलीस निरीक्षक भास्कर वायफळ यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी टँबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली मॉकिड्रलचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या प्रारंभी वायफळ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नागरिकांना व वाहन चालकांना यावेळी वाहतुक सुरक्षा बाबत भास्कर वायफळ,अमोल वालझाडे यांनी माहिती दिली.
यावेळी घोटी टेपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे,राष्ट्रीय महामार्गाचे राकेश ठाकूर,सहाय्यक उपनिरीक्षक संजय हिरे,मिहंद्र कंपनीचे अिग्नशमन दलाचे सेफ्टी म्यानेजर हरिष चौबे, अग्निशमन दलाचे अजय म्हसने, मनोहर जाधव, शौलेश तिवारी आदी उपस्थित होते.