मेळावा नियोजनार्थ कलावंतांची बैठक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 04:44 PM2018-11-13T16:44:54+5:302018-11-13T16:47:35+5:30
चांदवड : तालुक्यातील तिसगांव येथे पुढील महिन्यात होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक रविवारी श्री क्षेत्र तिसगांव ता.चांदवड येथे संपन्न झाली.
चांदवड : तालुक्यातील तिसगांव येथे पुढील महिन्यात होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक रविवारी श्री क्षेत्र तिसगांव ता.चांदवड येथे संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी शाहिर परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकरी संप्रदाय साहित्य परीषदेचे जिल्हाध्यक्ष शांताराम महाराज दुसाने, रेखा महाजन नंदा पुणेकर, तिसगावचे उपसरपंच कैलास खैरे, अखिल भारतीय मराठी शाहिर परीषद चांदवड तालुकाध्यक्ष गंगाधर महाराज गांगुर्डे, हिराबाई गांगुर्डे, उषा खैरे, वाळूबा महाराज रायपुर, छबु शिंदे, मधुकर महाराज जाधव जोपुळ, नवनाथ महाराज गांगुर्डे आदी उपस्थितीत होते. बैठकीत नवनाथ महाराज यांनी कार्यकमाची रु परेषा कशी असेल यावर मार्गदर्शन केले. कैलास खैरे यांनी मेळावाचे आयोजनाबद्दल सांगीतले. यानंतर विश्वास कांबळे यांनी लोककलेचे जतन आणि पुनर्वसन व्हावे यासाठी नव्या पिढीसमोर ही लोककला कायमस्वरूपी जीवंत राहायला पाहिजे यासाठी शासनाने अस्तिवात असलेल्या योजना, मागणी केलेल्या योजना सर्व कलावंतापर्यन्त पोहचवाव्यात लोककलावंत सक्षम व्हावेत या उद्देश्याने या मेळाव्याचे आयोजित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व कलावंतांना लोककला, अखिल भारतीय मराठी शाहिर परीषदे मार्फत मोफत ओळखपत्र दिले जाणार आहे,त्यासाठी कलावंत सभासद फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. सर्व कलावंतांनी ते फॉर्म तिसगांव येथून घेऊन आणि परत रविवार (दि.२५) पर्यंत तिसगांव येथेच जमा करावे. त्यासाठी व मेळाव्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. असे तालुकाध्यक्ष गंगाधर गांगुर्डे यांनी सांगितले. उपाध्यक्ष छबु शिंदे यांनी आभार मानले.