सटाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी मोलाचे योगदान दिले जात आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून शहरवासीयांची सेवा करणा-या या सर्व कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी नगराध्यक्षांनी अचानक आरोग्य विभागात हजेरी लावून कर्मचा-यांच्या कामकाजासोबतच त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठीच्या सेवा सुविधांचाही आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्षांनी कर्मचाºयांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.कोरोनाचा शहरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. सद्यस्थितीत शहर स्वच्छतेला महत्व असल्याने लॉक डाउनच्या काळातही खंड पडू न देता नियमित स्वच्छता केली जात आहे. तसेच शहरात फवारणी व धुरळणी करण्यात आली आहे. ग्रामीण रु ग्णालयासह महत्वाच्या आस्थापनांच्या ठिकाणीही नगर परिषदेमार्फत विशेष फवारणी करण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यवाहीसाठी नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी,कर्मचारी मेहनत घेत आहेत .शहरातील डेली भाजीपाला बाजार बंद करून फिरस्ती पद्धतीने घराघरापर्यंत भाजीपाला विक्र ी होत आहे.तसेच सर्व किराणा, दूध,मेडिकल,कृषी उपयोगी दुकाने,बँका,रेशन दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करण्यासाठी नगरपरिषदेने व्यवस्था केली आहे. शहरात चार कुटुंबे होम क्वारंटाइन करण्यात आली आहेत. त्यांच्यावर नगर परिषदेकडून विशेष लक्ष पुरविण्यात येत असून त्या कुटुंबांचा कचरा संकलनही स्वतंत्ररीत्या करण्यात येत आहे. नगरपरिषदेकडून शहरात लॉक डाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असताना त्यासाठी आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कर्मचा-यांचे मिळणारे महत्वपूर्ण योगदान पाहता शनिवारी नगराध्यक्ष मोरे यांनी विभागाला भेट दिली. यावेळी नगराध्यक्षांनी सर्व कर्मचा-यांना सुरक्षेसाठी पुरवण्यात आलेल्या साहित्याची माहिती घेत त्यांच्या सुरक्षेबाबत जाणून घेतले. यावेळी घंटागाड्यांच्या निर्जंतुकीकरण करण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिकही पाहण्यात आले. यानंतर नगराध्यक्ष व पदाधिका-यांनी संपूर्ण शहरात फिरु न सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छतेचा आढावा घेतला.यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासमवेत आरोग्य सभापती दीपक पाकळे, मुख्याधिकारी हेमलता डगळे,आरोग्य निरीक्षक माणिक वानखेडे, वाहन विभाग प्रमुख संदीप पवार , मुकादम किशोर सोनवणे, खलील पटेल व बजरंग काळे उपस्थित होते.
सटाणा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागास नगराध्यक्षांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 6:21 PM