सिन्नर येथे शहर पथविक्रेता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:05 AM2019-12-01T00:05:03+5:302019-12-01T00:06:03+5:30
सिन्नर : सिन्नर नगर परिषद, सिन्नर दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर पथविक्रेता समितीची बैठक झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : सिन्नर नगर परिषद, सिन्नर दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर पथविक्रेता समितीची बैठक झाली.
सिन्नर नगर परिषद कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांचे मोबाइल अॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने एकूण ९१२ लाभार्थींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सदर पथविक्रेत्यांची प्रारूप यादी नगर परिषद येथे लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. सिन्नर शहरातील ज्या पथविक्रेत्यांची अद्याप नोंदणी बाकी आहे, त्यांनी प्रथम नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच सदर यादीमधील नावांमध्ये काही सूचना, हरकती असल्यास पुढील तीस दिवसांच्या आत लेखी स्वरूपात घेणेबाबत सूचना अध्यक्ष, शहर पथविक्रेता समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी मांडल्या. त्यास सर्वानुमते समिती सदस्यांनी मंजुरी दिली. यादीमधील नावांमध्ये काही सूचना, हरकती असल्यास नगर परिषद कार्यालयातील शहर अभियान व्यवस्थापन कक्ष येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
पथविक्रेत्यांना नागरी सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शासन आराखडा तयार करीत असून, लवकरच नोंदणीकृत पथविक्रेत्यास मूलभूत सुविधा, बँक लिंकेज करून दिल्या जाणार आहे. नगर परिषद अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या पात्र पथविक्रेत्यांना लवकरच ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.
यावेळी बांधकाम अभियंता सुरेश गवांदे, सुनील शिंदे, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, नितीन परदेशी, नीलेश पवार, ताराचंद ख्ािंवसरा, राजश्री कपोते, डॉ. प्रतिभा गारे, विशाल वाघ, अरविंद गुजराथी, मंगेश आहेर, गोटीराम वराडे, आशाबाई पगारे, गणेश सोनवणे, संदीप लोळगे, मज्जीद शेख आदी उपस्थित होते.सर्वेक्षण सुरूराष्ट्रीय पथ विक्र ेता धोरण, पथविक्र ेता (उपजीविका
संरक्षण व विक्र ी विनियमन) अधिनियम २०१४, पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व विक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना २०१७ तसेच शासनाच्या विविध मार्गदर्शक सूचनांनुसार पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.