नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. दोन दिवसांत संबंधित ग्रामपंचायतीने थकबाकीची रक्कम जमा करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिला आहे. सिन्नर येथील पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, दीपक बर्के, विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, मानोरीचे सरपंच रामदास चकणे, कणकोरीचे सरपंच संपत चकणे, मºहळचे उपसरपंच काशीनाथ कुºहे, सदस्य भारत दराडे आदी उपस्थित होते. सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत; परंतु जलशुद्धीकरण केंद्राचे सुमारे १२ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने गतवर्षी वीजपुरवठा खंडित केला आहे. जलशुद्धीकरण केेंद्र दुरुस्तीवर खर्च करूनही त्यात वीज नसल्याने नागरिकांना थेट धरणातून नळ पाणीपुरवठा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र शोभेची वस्तू बनली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. उशिरा का होईना प्रशासनाला जाग येऊन या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीच्या प्रारंभी उपसरपंच नवनाथ कºहे यांनी पाणीपट्टी वसुली होत नसल्याचा विषय मांडला. मºहळ येथे पाणीपुरवठा नियमित होत नाही. जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जलकुंभात पाच गाव नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी वसुली थकली असल्याचे गाºहाणे त्यांनी मांडले. मुख्य जलवाहिनीला पाण्याच्या टाक्या जोडल्या असल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मºहळकर फक्त उन्हाळ्यात योजनेचे पाणी घेतात, उर्वरित आठ महिने स्थानिक विहिरीवरून पाणी मिळवतात. त्यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याचा आरोप सरपंच चकणे यांनी केला.
बैठक निष्फळ : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिलाचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:07 AM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही.
ठळक मुद्देदुरुस्तीसाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च कंपनीने गतवर्षी वीजपुरवठा खंडित केला