रुग्णालयातील अडचणीबाबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:15 PM2021-05-04T23:15:03+5:302021-05-05T00:51:59+5:30

चांदवड : येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड उपजिल्हा रु ग्णालय येथे सुरू झालेल्या कोविड व ट्रामा केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबद्दल बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

Meeting on hospital issues | रुग्णालयातील अडचणीबाबत बैठक

चांदवड येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार डॉ. राहुल आहेर, प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील व अधिकारी वर्ग.

Next
ठळक मुद्देचांदवड : शासकीय विश्रामगृहात आमदारांनी केले मार्गदर्शन

चांदवड : येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड उपजिल्हा रु ग्णालय येथे सुरू झालेल्या कोविड व ट्रामा केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबद्दल बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

यावेळी बैठकीत चांदवड तसेच संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या ऑक्सीजनच्या तुटवड्यासंदर्भात चर्चा झाली. कोणत्याही रु ग्णाला ऑक्सीजन कमी पडणार नाही व त्यामुळे कोणालाही आपला जीव गमवण्याची वेळ येता कामा नये. त्याचप्रमाणे ऑक्सीजनचा पुरेपूर उपयोग हा रु ग्णाला मिळावा अश्या सुचना आमदार डॉ. आहेर यांनी दिल्या. तसेच रेमिडिसिव्हर, फॅबीफ्यु व इतर औषधे ही वेळोवेळी जिल्ह्याला मागणी पाठवून जास्तीत जास्त औषधे उपलब्ध करून घ्यावीत व वेळोवेळी सर्व कोरोना बाधित रु ग्णांना योग्य औषधोपचार करण्यात यावे. तसेच साफसफाईच्या दृष्टीने त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे सांगितले.
आमदार डॉ.आहेर यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दुरध्वनीद्वारे संपर्क करून जास्तीचे सफाई कर्मचारी व मनुष्य बळ द्यावे, त्यामुळे नर्स व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडणार नाही याबाबत निर्णय घेण्यात आले.

यावेळी बैठकीस प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, मुख्याधिकारी अभिजित कदम, उपजिल्हा वैद्यकीय निरीक्षक डॉ.सोनवणे, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, बालविकास प्रकल्प अधिकारी चौधरी, डॉ. दळवी, डॉ. सतिश गांगुर्डे, डॉ. जीवन देशमुख, डॉ. शरद चव्हाण, प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Meeting on hospital issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.