ओझरच्या शहर विकास आराखड्याविषयी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:23+5:302021-06-20T04:11:23+5:30
बैठकीस ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदचे ...
बैठकीस ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदचे कामकाज कसे असेल, त्यामुळे मिळणाऱ्या मूलभूत सुविधा कोणत्या आणि कशा असतील, नव्याने करावयाच्या बांधकामांसाठी परवानगी कोठे आणि कशी मिळणार, शेती गट बिनशेती करण्यासाठी काय करावे लागेल, अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करण्यात आले. शहर विकास आराखडा म्हणजे काय आणि तो करण्यासाठी करावयाचे सहकार्य यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी तहसीलदार शरद घोरपडे, नगर परिषदचे प्रभारी अभियंता चेतन विसपुते, ब्रिजेश सिंह, लेखापाल नितीन भवर, क्रेडाईचे अध्यक्ष बापू जाधव, यतीन कदम, सेक्रेटरी राहुल देशमुख, उपाध्यक्ष सचिन आढाव, खजिनदार राहुल घोलप, अभिषेक देशमुख, आर्किटेक्ट नितीन वाघुळदे, अभियंता अमोल घोडके, सागर खर्डे, पराग भांबरे, अभिजित पगार, सागर शर्मा, मेहुल ठक्कर आदींची उपस्थिती होती. यावेळी क्रेडाईच्या वतीने नगर परिषदचे प्रशासक आणि मुख्याधिकारी, प्रभारी अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो- १९ ओझर बिल्डर्स
ओझर नगर परिषदेत बांधकाम व्यावसायिकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर.
===Photopath===
190621\19nsk_35_19062021_13.jpg
===Caption===
फोटो- १९ ओझर बिल्डर्स ओझर नगरपरिषदेत बांधकाम व्यवसायिकांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर.