ब्राह्मण गाव ( वार्ताहर ) कोरोना व्हायरस ची देश भरातील परिस्थिती पाहता या बाबत त आवश्यक ती काळजी व उपाययोजना बाबत येथील प्राथमिक आरोगय केंद्रात जिल्हा परिषद सदस्या लता बाछाव यांचे अध्यक्षतेखाली तातडीची रु ग्ण कल्याण समितीची बैठक घेण्यात आली.तसेच देश भरात सद्या कोरोणा व्हायरस ने निर्माण केलेले संकट पाहता त्याचा लढा देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलून वेळीच काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.सरपंच सरला अहिरे यांनी गावात ग्रामपंचायती मार्फत कोरोना व्हायरस बद्दल यथोचित काळजी घेण्याबाबत प्रसिध्दी बॅनर लावण्या असल्याचे तर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर्फे आशा स्वयंसेविका मार्फत गावात घरोघरी कोरॉना व्हायरस पासून कशी काळजी घ्यावी याची माहिती पत्रक वाटण्याचे निर्णय घेण्यात आला.या प्रसंगी वैद्यकिय अधिकारी राहुल कांबळे, सौ .सोनवणे, विलास बचावआवारे ,समिती सदस्य यशवंत बापू अहिरे, बाजीराव अहिरे, निंबा अहिरे, यांनी मार्गदर्शन केले. --
रु ग्ण कल्याण समतीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 1:25 PM
ब्राह्मण गाव ( वार्ताहर ) कोरोना व्हायरस ची देश भरातील परिस्थिती पाहता या बाबत त आवश्यक ती काळजी व उपाययोजना बाबत येथील प्राथमिक आरोगय केंद्रात जिल्हा परिषद सदस्या लता बाछाव यांचे अध्यक्षतेखाली तातडीची रु ग्ण कल्याण समितीची बैठक घेण्यात आली.
ठळक मुद्देबैठकीत प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता, परिसर सुशोभिकरण करणे, स्यानेतरी नॅपिकन खरेदी यावर चर्चा करण्यात आली.आशा स्वयंसेविका यांचे कामकाज , ओष धे खरेदी बाबत चर्चा करण्यात आली.