नाशिक : पुणे येथील सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन व लोकमतच्या वतीने गेल्या शालांत परीक्षेत विविध शाळांमध्ये प्रथम आलेल्या नाशकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शानदार सत्कार समारंभ अंबड येथील लोकमतच्या हिरवळीवर शनिवारी (दि.३१) मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सूर्यदत्ता एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय चोरडिया, एक्झुकेटिव्ह डायरेक्टर अक्षित कौशल, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सखाराम पवार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, हॉली फ्लॉवर स्कूलचे प्राचार्य शरद साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ. चोरडिया म्हणाले, जीवन समृद्ध करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना वाचनावर विशेष भर देत, वाचन हे जीवनाचा एक अविभाज्य घटक बनविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीदेखील जपल्या पाहिजेत, आवडणाऱ्या गोष्टी आपण अधिक चांगल्या करू शकतो, असेही चोरडिया यांनी सांगून ह्यविद्यार्थ्यांनी दहावीनंतर काय करायचे, पुढील मार्ग कोणतेह्ण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.शिक्षणाबरोबरच निरोगी राहत नातेसंबंधाची जपणूक करीत जीवन यशस्वी केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी यशस्वी होताना अपयशही पचविण्याची तयारी ठेवायला हवी, पालकांनी त्यासाठी मुलांना तयार करावे, २०२४ साली भारत सर्वांत तरुणांचा देश राहील आणि सरासरी २८ वय असेल असे सांगत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व धनादेश देत सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी पालकांचा आदर करायलाच हवाविद्यार्थ्यांनी अभ्यास किमान ७ ते ८ तास केला पाहिजे. त्या कालावधीत मोबाइल दूर ठेवल्यास अभ्यासात एकाग्रता नक्की मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांचा आदर करीत प्रत्येक वेळी संवाद साधायला हवा, त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळा वाढीस भर पडते.- डॉ. संजय चोरडिया, संस्थापक-अध्यक्ष, सूर्यदत्ता एज्युकेशन, पुणे.