कोट... अंबड येथील सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला असता. सभासदांकडून शुल्क घेण्यात आले आहे. मात्र, एमआयडीसी आपल्या हिश्श्याचा निधी देण्यास तयार नाही आणि आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीनेच सीईटीपी उभारला पाहिजे. डिसेंबर महिन्यातच तसे पत्र दिले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून एमपीसीबी कायद्याचा आधार घेऊन उद्योग बंदची वेळोवेळी कारवाई करीत आहे.
- समीर पटवा, उपाध्यक्ष नाशिक सीईटीपी फाउंडेशन.
कोट...
प्लेटिंग उद्योगांवर वारंवार होणाऱ्या कारवाईने उद्योजक मेटाकुटीला आले आहेत, तरीही आयमा त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहून त्यांनी सहकार्य मागितल्यास नक्कीच मदत करू. सीईटीपी प्रकल्प उभारावा म्हणून आयमाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल. हा प्रकल्प एमआयडीसीनेच उभारला पाहिजे.
- वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा.