कसमादे पट्यात लष्करी अळीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 06:46 PM2020-06-30T18:46:27+5:302020-06-30T18:48:08+5:30

वटार : बागलाण नव्हे तर पूर्ण कसमादे परीसरात अमेरिकन लष्करी अळीचे आक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने बळीराज्याच्या पायाखालची माती सरकली आहे, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.

Military larvae in the Kasmade belt | कसमादे पट्यात लष्करी अळीचा विळखा

लष्करी अळीने बाधित झालेल्या मका पिकाची पाहणी करताना दिलीप देवरे, सुधाकर पवार, सचिन हिरे, धनंजय सोनवणे, समवेत शेतकरी.

Next
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : कृषी विभागामार्फत बांधावर पाहणी

वटार : बागलाण नव्हे तर पूर्ण कसमादे परीसरात अमेरिकन लष्करी अळीचे आक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने बळीराज्याच्या पायाखालची माती सरकली आहे, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.
पावसाळा सुरू होताच सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या उरकल्या पण नंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हताश झाला होता. गेल्या चार पाच दिवसापासून पुन्हा पावसाने मोर्चा बागलाणमध्ये वळवल्याने बळीराज्याच्या जीव मुठीत आला आहे. मात्रअस्मानी संकटानी बळीराज्याला पुन्हा आता लष्करी अळीचा धस्का बसका आहे , कारण मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केल्याने शेतकरी संकटात सापडलाआहे.
परिसरात बºयाच शेतकºयांच्या मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केले. पिकाच्या पानावर पांढरे चट्टे पडू लागले आहेत. ही लष्करी अळी पोग्यातील कोवळी पाने खाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने मका पिक वाया जाण्याचा धोका वाढला आहे.
शासनाच्या कृषी विभागामार्फत लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी खेडोपाडी मार्गदर्शन शिबीर राबवत आहेत.मका पिकांचे दर दोन दिवसांनी निरीक्षण करावे कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या औषधांचा अवलंब केल्यास मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन करून मक्याचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते असे कृषिविभागामार्फत सांगण्यात आले.
कोट..
आमची टीम प्रत्येक तालुक्याचा दौरा करत आहे. जर शेतकºयांना अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्वरीत कृषी विभागाने प्रमाणित औषधे वापरली तर दोन ते तीन आठवड्यात लष्करी अळीचे नियंत्रण शेतकरी करू शकतो.
- दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगांव.
माझ्या चार एकर मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महागडी औषध फवारणी केली, पण अळी काही पिच्छा सोडण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
- जिभाऊ खैरनार, शेतकरी, वटार.
 

Web Title: Military larvae in the Kasmade belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.