लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:21 AM2019-10-28T00:21:47+5:302019-10-28T00:22:19+5:30

भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात लक्ष्मीपूजेला अनन्य साधारण महत्व असून रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजेचा मुहूर्तसाधत शहरातील अनेक व्यावसायिकांनी नवीन व्यावसायिकांची सुरुवात केली.

 Millions of turnover at the mouth of Lakshmipuja | लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल

लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल

Next

नाशिक : भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात लक्ष्मीपूजेला अनन्य साधारण महत्व असून रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजेचा मुहूर्तसाधत शहरातील अनेक व्यावसायिकांनी नवीन व्यावसायिकांची सुरुवात केली. तर अनेकांनी घराचे स्वप्न साकार करीत आपल्या हक्काच्या नवीन घरात प्रवेश केला.तर स्थीर स्थावर झालेल्याना नाशिककरांनी वाहन खरेदीला प्राधान्य दिले. यात चारचाकी वाहनांचे प्रमाण अधिक असले तरी व्यावसायिक वाहनांचीही ग्राहकांनी लक्ष्मीपूजेला मोठ्या प्रमाणात खरेदी केली. तर शेतकऱ्यांनी ट्रक्टर आणि शेतीउपयोगी साधनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्याचप्रमाणे यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे खरिपासोबतच रब्बीचे पीकही चांगले येण्याची अपेक्षा असल्याने गुंतवणूक अनेकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिल्याने सराफ बाजारालाही झळाळी प्राप्त झाल्याने नाशिकच्या बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाली.
शहरात आठवडाभरापासून पावसाच्या वातावरणामुळे दिवाळीच्या खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. औद्योगिक वसाहत आणि खासगी आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारपासून सुट्या असल्यामुळे कुटुंबातील सर्वांना कपडे, सजावटीचे साहित्य, लक्ष्मीमातेची प्रतिमा, मूर्ती, पूजा साहित्य, पणत्या, अकाशकंदील, केरसुनीसह किराणा, सुकामेवा, कपडे, खाद्यपदार्थ, भेटवस्तूंची ग्राहकांनी जोरदार खरेदी केली.
शहरातील बाजारपेठांसह विविध मॉलमधील सवलतीकडेही ग्राहक मोठ्या प्रमाणात आक र्षित झाल्याचे पाहायला आले. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी केली. त्याचप्रमाणे अनेकांनी लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर वाहन खरेदी केली असून, अनेकांनी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे नियोजन केले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चारचाकी वाहनांसोबतच व्यावसायिक वाहनांची खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या
मोठ्या प्रमाणात असून, संपूर्ण दीपोत्सवात रोज किमान तीनशे ते चारशे दुचाकी वाहनांची विक्री झाली असून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर हा आकडा तीन ते साडेतीन हजारांवर पोहोचल्याचे वितरकांनी सांगितले.
सण उत्सवाच्या काळात वाहन बाजारात तेजी आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची वर्दळ वाढल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होऊन वाहानांची विक्री वाढली आहे. मात्र पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि सरकारचे वाहन बाजाराविषयीचे धोरण यावरून हा ट्रेंड पुढे चालणार की नाही ते ठरणार आहे.
- सुरेंद्र पुजारी, सीईओ, वासन टोयोटो
चोख सोने खरेदीला पसंती
सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मूहूर्तावर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आणि चांदीच्या भांड्याची खरेदी केल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल झाली. नाशिकरांनी लक्ष्मीपूजेला चोख सोने खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती दिली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही सोन्याचे भाव ३८ हजार ६०० रुपयांपर्यंत स्थिर राहिले. तर चांदीच्या भावात मात्र काही प्रमाणात वाढ झाली.

Web Title:  Millions of turnover at the mouth of Lakshmipuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.