शहरात हंगामातील किमान तपमानाची नोंद

By admin | Published: January 11, 2015 12:19 AM2015-01-11T00:19:21+5:302015-01-11T00:29:16+5:30

थंडी वाढणार : ढगाळ वातावरणाची टांगती तलवार कायम

Minimum Temperature Record in the City | शहरात हंगामातील किमान तपमानाची नोंद

शहरात हंगामातील किमान तपमानाची नोंद

Next

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून समुद्र भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट आली आहे. ढगाळ वातावरण आणि दाट धुके यांचा सामना केल्यानंतर मोसमातील सर्वाधिक थंडीचा सामना नाशिककरांना करावा लागतो आहे. आतापर्यंत ६ अंशांपर्यंत आलेला पारा शनिवारी थेट ५ पर्यंत घसरल्याने पाऊस आणि धुके नसतानाही नाशिककरांना थंडीचा सामना करावा लागला.
धुक्यातून नाशिककरांना दिलासा मिळतो न मिळतो तोच पहाटे आणि रात्रीच्या सुमारास पुन्हा थंडी पडू लागली आहे. दोन दिवसांपासून शहराच्या तपमानात घट होत असून, शनिवारी मोसमातील नीचांकी ५.८ अंश सेल्सिअस तपमान नोंदविण्यात आले. परिणामी, रात्रीच्या वेळेस नाशिककरांना हुडहुडी भरली. मध्य समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर आलेल्या पावसाने परिणाम झाला होता. त्यामुळे थंडी वाढली होती. याचदरम्यान उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आणि थंडीत पुन्हा वाढ झाली होती. त्यानंतर थंडी कमी होत चालली असताना पुन्हा पारा घसरल्याने थंडी वाढीस लागली. येत्या काही दिवसांत ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी वर्तविली आहे. थंडी वाढण्याबरोबरच ढगाळ वातावरणाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात नागपूरचे तपमान सर्वात कमी ५.२ अंश आहे. त्यापाठोपाठ नाशिकचा ५.८ क्रमांक असून, जवळपास १० जिल्ह्यांमध्ये ८च्या आत पारा घसरला आहे. येत्या काही दिवसांत नाशिकचा पारा ५ पर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Minimum Temperature Record in the City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.