मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 06:18 PM2021-01-17T18:18:36+5:302021-01-17T18:19:03+5:30
वेळुंजे :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच हरसूल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हरसूल शहरापासून शिरसगावमार्गे मुरंबी ते भागओहळ तसेच अन्य गावांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. जेमतेम चार किलोमीटरचे अंतर असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात लहानमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्ता की खड्डा अशी शंका येण्याइतपत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रस्त्यावरील खडीही मोठ्या प्रमाणावर उखडलेली असल्याने मोटारसायकलस्वारांची वाहन चालविताना फजिती होऊन लहान - मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तसेच चारचाकी वाहनधारकांना हा रस्ता डोकेदुखी ठरत आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना खड्ड्यांमुळे शारीरिक व्याधी जडत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याऐवजी वाहनधारकांवर साईटपट्टीचा वापर करण्याची वेळ आली आहे. हा रस्ता दुरवस्थेमुळे नागरिकांना असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.संबंधित विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.