मनपा सफाई कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने खून

By admin | Published: June 1, 2017 02:06 AM2017-06-01T02:06:11+5:302017-06-01T02:06:20+5:30

शस्त्राने वार करून खून केल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून त्यानंतर रामवाडी गोदावरी नदीपात्रात फेकण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला़

MMP cleanup employee's sharp weapon killed | मनपा सफाई कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने खून

मनपा सफाई कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्याच्या पाठीवर, पोटावर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून त्यानंतर रामवाडी परिसरातील गोदावरी नदीपात्रात फेकण्यात आल्याचा प्रकार बुधवारी (दि़३१) दुपारी उघडकीस आला़ खून करण्यात आलेल्या महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचे नाव अरुण बर्वे (३८, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) असे आहे़
रामवाडी परिसरात कोशिरे मळा असून या मळ्यासमोरच गोदावरी नदीपात्र आहे. बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास परिसरातील काही नागरिक नदीपात्रालगत उभे असताना एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला़ त्यांनी ही बाब पंचवटी पोलिसांना कळविली़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
पोलिसांना मृतदेहाच्या पाठीवर, पोटावर तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे आढळून आले़ मृतदेहाच्या एका हातावर अरुण हे नाव तर दुसऱ्या हातावर शिवाजी महाराजांचे चित्र गोंदलेले होते़ या इसमाच्या अंगात बनियन, काळ्या रंगाची पँट व पायात मोजे असल्याने सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटविणे अवघड झाले होते़ पोलिसांनी परिसरातील नागरिकांना बोलावून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता मखमलाबाद रोडवरील उदय कॉलनीतील बच्छाव हॉस्पिटलच्या मागे राहणारा सफाई कर्मचारी अरुण बर्वे याचा मृतदेह असल्याचे समोर आले़

Web Title: MMP cleanup employee's sharp weapon killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.