मनरेगाने दिले मजुरांच्या हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:02 PM2020-05-25T21:02:53+5:302020-05-26T00:07:29+5:30
त्र्यंबकेश्वर : राज्य शासनाने लॉकडाउनमध्ये सवलत देऊन मनरेगाची कामे सुरू केली आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. हाताला काम मिळाल्याने तालुक्यातील मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
त्र्यंबकेश्वर : राज्य शासनाने लॉकडाउनमध्ये सवलत देऊन मनरेगाची कामे सुरू केली आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.
हाताला काम मिळाल्याने तालुक्यातील मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यात एकूण १२४ गावे असून, ८४ ग्रामपंचायती आहेत. मात्र सध्या जेथे टंचाईची स्थिती आहे त्या ३२ गावांचा मनरेगा कामात समावेश केल्याची माहिती गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिली.
यामध्ये बेरवळ, ब्राह्मणवाडे, चिंचओहळ, दलपतपूर, देवडोंगरा, देवडोंगरी, देवगाव, देवळा, हातलोंढी, हिरडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, कळमुस्ते, खरवळ, खेरायपाली, कोटंबी, मेटघर, मूळवड, ओझरखेड, पेगलवाडी, पिंप्री, सापतपाली, सारस्ते, शिवाजीनगर, सोमनाथनगर, टाकेहर्ष, ठाणापाडा, तोरंगण, वाघेरा, वेळुंजे, झारवड खुर्द अशा एकूण ३२ गावांमध्ये ३६४ कामांचा समावेश आहे.
----------------------------
आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या देखरेखीखाली मनरेगाचे ज्ञानेश्वर धारराव, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डी. एच. राठोड, दादा पाटील आदींसह सेवाभावी संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ घाटाळ आदी मनरेगाच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.