शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
6
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
7
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
8
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
9
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
10
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
11
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
12
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
13
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
14
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
15
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
16
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
17
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
18
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
19
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
20
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

पूर्व प्रभागवर मनसे-अपक्षांचा दावा

By admin | Published: March 14, 2016 11:52 PM

सभापतिपदासाठी चुरस : सर्वाधिक सदस्य असूनही मनसे उपेक्षित

 इंदिरानगर : महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापती पदासाठी एप्रिलमध्ये निवडणुका होणार असून, नाशिक पूर्व प्रभाग सभापतिपदाकरिता यंदा पुन्हा अपक्षांनी दावा सांगितला आहे, तर सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या मात्र गेल्या चार वर्षांत उपेक्षित राहिलेल्या मनसेकडूनही दावा केला जात आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी सत्ताधारी महाआघाडीतच चुरस बघायला मिळण्याची शक्यता आहे.नाशिक पूर्व प्रभाग समितीमध्ये मनसे-९, राष्ट्रवादी-५, शिवसेना-१, भाजपा-२, अपक्ष-३, कॉँग्रेस-४ असे पक्षीय बलाबल आहे. त्यात मनसेचे डॉ. दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे, अर्चना जाधव, गुलजार कोकणी, वंदना शेवाळे, सुमन ओहोळ, मेघा साळवे, अर्चना थोरात, राष्ट्रवादीचे विनायक खैरे, संजय साबळे, सुफी जीन, रंजना पवार व नीलिमा आमले, कॉँग्रेसचे शाहू खैरे, वत्सला खैरे, समीना मेमन व राहुल दिवे, शिवसेनेचे सचिन मराठे, भाजपाचे सतीश कुलकर्णी व प्रा. कुणाल वाघ, अपक्ष गटाचे संजय चव्हाण, रशिदा शेख व शबाना पठाण यांचा समावेश आहे. मनसेचे सतीश सोनवणे हे भाजपात दाखल झाले असल्याने मनसेचे संख्याबळ ८ झाले आहे. महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि अपक्ष यांची महाआघाडी आहे. गेल्या चार वर्षांत पूर्व प्रभागवर कॉँग्रेसच्या समीना मेमन यांनी दोनदा तर भाजपाचे प्रा. कुणाल वाघ व अपक्ष शबाना पठाण यांनी एकदा सभापतिपद भूषविलेले आहे. अखेरच्या वर्षी सभापतिपदावर अपक्षांनी पुन्हा एकदा दावा सांगितला असून, शबान पठाण यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, सत्ताधारी मनसेला गेल्या चार वर्षांत जास्त संख्याबळ असूनही सभापतिपद न मिळाल्याने मनसेकडूनही दावेदारी केली जात आहे. त्यात प्रामुख्याने, वंदना शेवाळे, अर्चना जाधव व अर्चना थोरात यांच्या नावांची चर्चा आहे. (वार्ताहर)