कळवण तहसीलदारांना मनसेतर्फे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:09 AM2018-03-02T00:09:17+5:302018-03-02T00:09:17+5:30
कळवण : सरकार आपले वाटण्यासाठी सरकार व जनता दोघांमधले संभाषण हे एकाच भाषेत व्हायला हवे.
कळवण : सरकार आपले वाटण्यासाठी सरकार व जनता दोघांमधले संभाषण हे एकाच भाषेत व्हायला हवे. राज्य सरकारची शासकीय भाषा मराठीच राहील यासाठी आग्रह धरून शासकीय कामकाज मराठीतून करावे, अशी मागणी मनसेने कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले. मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे. ठाकरे यांच्या सहीचे पत्र शशिकांत पाटील यांनी यावेळी तहसीलदारांना दिले. सामान्य मराठी माणसाच्या किरकोळ कामासाठी त्याचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.