नाशकात मनसे महिलांचे ‘जोडोमार’ आंदोलन

By श्याम बागुल | Published: September 5, 2018 04:19 PM2018-09-05T16:19:01+5:302018-09-05T16:24:30+5:30

गेल्या काही महिन्यात महाराष्टÑातून ३३ हजार महिला बेपत्ता झाल्या असल्याने त्यांना पळवून नेण्यामागे राम कदम यांचा हात आहे काय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आलाी.

MNS women's 'Jodomar' movement in Nashik | नाशकात मनसे महिलांचे ‘जोडोमार’ आंदोलन

नाशकात मनसे महिलांचे ‘जोडोमार’ आंदोलन

Next
ठळक मुद्दे भाजप आमदार राम कदम यांनी मुलींबद्दल काढलेअनुद्गारभारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात जोरदार घोेणाबाजीही

नाशिक : भाजप आमदार राम कदम यांनी मुलींबद्दल काढलेल्या अनुद्गाराच्या निषेधार्थ महाराष्टÑ नव निर्माण सेनेच्या महिला आघाडीने कदम यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडो मार’ आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात जोरदार घोेणाबाजीही करण्यात आली.
महिला आघाडीच्या रिना सोनार यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात महिलांना राम कदम यांच्या प्रतिमेला चपलांनी मारून निषेध नोंदविला. भारतीय जनता पक्षाचा महिलांकडे पाहण्याचा काय दृष्टीकोन आहे हे यातून स्पष्ट होत असून, गेल्या काही महिन्यात महाराष्टÑातून ३३ हजार महिला बेपत्ता झाल्या असल्याने त्यांना पळवून नेण्यामागे राम कदम यांचा हात आहे काय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आलाी. या आंदोलनात कामिनी दोंदे, अरूणा पाटील, पद्मीनी वारे, भानुमती अहिरे, मुक्ता इंगळे, धनश्री ढोले, उज्वला थूल अशा मोजक्याच पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट===
पदाधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ
भाजप आमदार राम कदम यांनी समस्त महिला वर्गाचा अवमान केल्याची भावना व्यक्त केली जात असताना मनसेच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनाकडे मात्र पुरूष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली. दोनच दिवसांपुर्वी राज ठाकरे नाशिक दौºयावर आले असता, त्यांच्या मागे-पुढे करणारे शहरातील पदाधिकारी देखील या आंदोलनाकडे फिरकले नाहीत, राम कदम हे पुर्वी महाराष्टÑ नव निर्माण सेनेत असल्यामुळे पक्षाच्या पदाधिकाºयांचे जुने प्रेम उफाळून आल्यामुळेच त्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले असावे अशी चर्चा यावेळी रंगली होती.
 

 

Web Title: MNS women's 'Jodomar' movement in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.