मोबाईलने मेमरी घालविली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:33+5:302021-07-08T04:11:33+5:30
नाशिक : मोबाईल आल्यापासून बहुतांश नागरिकांनी घड्याळापासून फारकत घेतली. त्याचप्रमाणे मोबाईल आल्यावर कुणाचेही फोन नंबर, मोबाईल नंबर लक्षात ठेवण्याची ...
नाशिक : मोबाईल आल्यापासून बहुतांश नागरिकांनी घड्याळापासून फारकत घेतली. त्याचप्रमाणे मोबाईल आल्यावर कुणाचेही फोन नंबर, मोबाईल नंबर लक्षात ठेवण्याची मेंदूची प्रक्रियाच जणू ठप्प झाल्यासारखी झाली आहे. त्यामुळे नंबर्स लक्षात ठेवणेच मेंदू जणू विसरून गेला असून मेंदूची न्युमरिकल क्षमताच त्यामुळे कमी होत आहे किंवा घालवून बसू की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
इन्फो
असे का होते?
कोणत्याही मोबाईल किंवा लँडलाईन क्रमांकाबाबत मेंदूला ताण देण्याची गरजच उरलेली नसल्याने स्मरणशक्तीला ताणच दिला जात नाही. तसेच पाढे, आकडेमोड न करता थेट कॅल्क्युलेटरचा वापर केला जातो. कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध असल्यास त्यासाठी मेहनत न करण्याकडेच माणसाचा कल असतो. त्यामुळे बुद्धीला ताण द्यायला नको, तसेच ऐनवेळी नंबर विसरला किंवा आकडेमोड चुकली तर समस्या नको. यामुळेच मोबाईल, कॅल्क्युलेटर यांसारख्या गोष्टींचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच सतत मोबाईल हाताळण्याने बहुतांश नागरिकांमध्ये अस्वस्थता, चंचलता मोठ्या प्रमाणात वाढल्यानेदेखील स्मृती ठेवण्याची क्षमता कमी होते.
इन्फो
हे टाळता येऊ शकते
दिवसभर संपूर्ण कुटुंबाने मोबाईल, टीव्ही, टॅब, लॅपटॉप, संगणक अशा कोणत्याही स्क्रीनपासून लांब रहावे.
झोपताना मोबाईल झोपण्याच्या जागेपासून लांब ठेवून पुरेशी झोप घ्यावी.
मेमरी गेम्स, बुद्धिबळ, शब्दकोडी, स्मरण स्पर्धा यांचा दररोजचा सराव ठेवावा.
प्राणायाम, योगा, चिंतन, मनन यासाठी दिवसाचा काही वेळ निश्चितपणे द्यावा
प्रतिक्रिया
मोबाईलचा सर्वांत मोठा दुष्परिणाम ज्येष्ठांपेक्षाही मुलांच्या बौद्धिक शक्तीवर होऊ लागला आहे. आधीच मुलांना पाढे पाठ नाहीत. आता तर त्यांना कोणताही नंबर लक्षात ठेवायचा असतो, मेंदूत साठवून ठेवायचा असतो हेच ते विसरून गेले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांचे जेवढे नुकसान झाले त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक बालकांचे नुकसान झाले आहे.
मुलांना मोबाईलचे अक्षरश: वेड लागले आहे. मोबाईल हातात नसेल तर ते काहीच करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती या नवीन शिक्षण पद्धतीमुळे निर्माण झाली आहे. मुलांना पुस्तकातील शब्दांशिवाय अन्य आकडे, आकडेमोड लक्षात ठेवायची असते, हेच माहिती नसल्यासारखे झाले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मात्र अद्यापही नंबर्स लक्षात ठेवणे किंवा आकडेमोड तोंडी करण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांच्या न्युमरिकल स्मृती बऱ्यापैकी शाबूत असल्याचा अनुभव येत आहे. त्यांचा मोबाईल वापर हा केवळ फोन लावणे किंवा मेसेज पाहणे किंवा व्हॉट्सॲप करणे इतक्यापुरताच मर्यादित असल्याने त्यांना विस्मृतीचा तितकासा फायदा झाला नसल्याचे दिसून येते.
-----------
ही डमी आहे.