इंदिरानगर : परिसरात मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पादचारी आणि वाहनधारकांच्या अंगावर धावून कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोकाट कुत्रे पकडले जात असल्याचे पालिकेकडून वारंवार सांगितले जाते; मात्र पालिकेचे श्वान पकडणारे वाहन दृष्टीसही पडत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. गजानन महाराज मार्ग, मोदकेश्वर चौक ते बापू बंगला, सावरकर चौक ते पेठेनगर, वडाळा पाथर्डी रस्ता, राजे छत्रपती चौक ते राजीवनगर झोपडपट्टी, श्रीकृष्ण चौक ते राणेनगर चौफुली आदि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच जिल्हा परिषद कॉलनी, उद्यान कॉलनी, राणेनगर भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा असल्याने विद्यार्थ्याची वर्दळ असते. याच भागात मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे व अंगावर धावून चावा घेण्याचे प्रकार वाढल्याने विद्यार्थी व नागरिक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)
मोकाट कुत्र्यांचा उच्छाद कायम
By admin | Published: December 10, 2015 12:09 AM