तिघा सोनसाखळी चोरांवर ‘मोक्का’ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:31 PM2019-11-12T23:31:04+5:302019-11-13T00:03:37+5:30

शहरासह जिल्ह्यात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून फरार होणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने काही दिवसांपूर्वी आवळल्या. सराईत गुन्हेगार सोमनाथ हिरामण बर्वे (३०,रा.मातोरी), नितीन निवृत्ती पारधी (२५,रा.फुलेनगर) आणि अनिल भाऊराव पवार (२३,रा.सय्यद पिंप्री) या त्रिकुटांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी महाराष्टसंघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे.

 'Mokka' action on three gold chain thieves | तिघा सोनसाखळी चोरांवर ‘मोक्का’ची कारवाई

तिघा सोनसाखळी चोरांवर ‘मोक्का’ची कारवाई

Next

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून फरार होणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने काही दिवसांपूर्वी आवळल्या. सराईत गुन्हेगार सोमनाथ हिरामण बर्वे (३०,रा.मातोरी), नितीन निवृत्ती पारधी (२५,रा.फुलेनगर) आणि अनिल भाऊराव पवार (२३,रा.सय्यद पिंप्री) या त्रिकुटांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी महाराष्टसंघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. चंदन चोरट्यांच्या टोळीनंतर शहरात सोनसाखळी चोरट्यांवर मोक्काची ही दुसरी कारवाई आयुक्तालयाकडून करण्यात आली.
आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि सोनसाखळ्या हिसकावणाºया गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण व्हावा, या उद्देशाने नांगरे-पाटील यांनी संघटितपणे जबरी चोरीसारखे गुन्हे वारंवार करणाºया या त्रिकुटांवर मोक्का लावला आहे. या त्रिकु टांपैकी दोघांनी मिळून २३ एप्रिल २०१९ रोजी औरंगाबादरोडवरील एका लॉन्स समोरून पायी जाणाºया स्वाती विजय परमेश्वर (रा. पुणे) यांच्या गळ्यातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे ७२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करून पेठ फाटा परिसरातून सोमनाथ बर्वे आणि नितीन पारधी यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्या दोघांना ‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर त्यांनी त्यांचा सय्यदपिंप्रीमध्ये राहणारा साथीदार अनिल भाऊराव पवारच्या मदतीने शहरासह ग्रामीण भागात सुमारे नऊ जबरी चोºया केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
स्पोर्टस् बाइकवरून ‘रॉबरी’
त्रिकुटांकडून ७ लाख ४७ हजार ५०० रु पयांच्या सोन्याच्या नऊ लगड जप्त केल्या आहेत. या टोळीचा प्रमुख नितीन पारधी हा सोनसाखळी ओरबाडण्यासाठी स्पोर्टस बाइकचा वापर करत होता. संघटितपणे गुन्ह्यांचे कट रचून शहरासह ग्रामीण भागात या त्रिकुटांनी महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे संघटित गुन्हेगारी संपविण्यासाठी नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी त्रिकुटांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का प्रस्तावित केला. त्यास मंजुरी मिळाली असून, त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title:  'Mokka' action on three gold chain thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.