बंदुकीचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:03 AM2018-11-19T00:03:32+5:302018-11-19T00:47:12+5:30

किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणावरून आठ जणांनी संगनमत करून महिलेचा विनयभंग करीत बंदुकीचा धाक दाखवून २५ हजारांची रोकड जबरी चोरी करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी किल्ला पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Molestation of woman by showing gunshot wounds | बंदुकीचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग

बंदुकीचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग

Next

मालेगाव : किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणावरून आठ जणांनी संगनमत करून महिलेचा विनयभंग करीत बंदुकीचा धाक दाखवून २५ हजारांची रोकड जबरी चोरी करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी किल्ला पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. २० मे २०१८ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हिरापुरा जैतुनअब्दुल कादीर मशिदीच्या गल्लीत ही घटना घडली. याप्रकरणी शाहीदा मोहंमद इम्रान कादीर (३८) या महिलेने काल फिर्याद दिली. फिर्यादी महिलेचा मुलगा अदनान समीर हा जैतुन अब्दुल कादीर मशिदीत नमाज पठणासाठी गेला असता त्या ठिकाणी झालेल्या किरकोळ भांडणावरुन शकीला नावाच्या महिलेच्या मुलाने फिर्यादीच्या मुलास मारहाण केली, असे तो घरी येऊन सांगत असताना शेख फिरोज शेख कलीम ऊर्फ गांजावाला व त्याच्या सोबतच्या सात जणांनी संगनमत करून अनाधिकाराने फिर्यादीचा हात धरुन फिरोज शेख याने तिचा विनयभंग केला. त्याच्या एका साथीदाराने बंदूक फिर्यादीस दाखवून कपाटातील २५ हजारांची रोकड काढून घेतली व अन्य दोन जणांनी आम्ही आमचे कपडे फाडून घेऊन तुझ्या नवऱ्यास खोट्या केसमध्ये फसवून देऊ असे म्हणून ५० हजारांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुझ्या घरावर कब्जा करू, असे म्हणत शिवीगाळ केली.
चेहºयावर सुरीने वार केल्याने एक जखमी
मालेगाव : शिवीगाळ करू नको असे सांगितल्याचा राग येऊन अमीन यामीन ऊर्फ अबु रा. इस्लामाबाद सिद्धार्थवाडी याने अब्दुल रज्जाक अन्वर खान (५२) या इसमाच्या चेहºयावर सुरीने वार करुन जखमी केले. याप्रकरणी अब्दुल रज्जाक यांनी किल्ला पोलीसात फिर्याद दिली. फिर्यादीचा मुलगा शकील याच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास इस्लामाबाद सिद्धार्थवाडी येथे घडली होती.
मयत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन
मालेगाव : येथील मोतीबाग नाका रिक्षा स्टॅँडवर रस्त्याचे कडेला अनोळखी इसम १७ नोव्हेंबर रोजी पहाटे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. वय ६५ ते ७० वर्ष, नाव, गाव समजून आले नाही. उंची ५ फूट ३ इंच, रंग काळा-सावळा, शरीराने हडकुळा, कपडे भुरकट रंगाचा व उभ्या पांढºया रंगाचे लाईनचा फुल बाहीचा शर्ट व निळसर रंगाची फुलपॅण्ट डोक्यास व दाढीला पांढरे केस वर्णनाच्या इसमाबाबत छावणी पोलिसांशी संपर्क साधावा

Web Title: Molestation of woman by showing gunshot wounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.