कलकत्ता येथील व्यापाऱ्याचे मिळवुन दिले पैसे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 06:13 PM2021-02-28T18:13:12+5:302021-02-28T18:16:36+5:30
लासलगाव : कलकत्ता येथील अंजना मुखर्जी या कांदा व्यापाऱ्याचे पैसे घेवून ते देण्यास टाळाटाळा करत असलेल्या व्यापाऱ्याविरूद्ध विशेष पोलिस ...
लासलगाव : कलकत्ता येथील अंजना मुखर्जी या कांदा व्यापाऱ्याचे पैसे घेवून ते देण्यास टाळाटाळा करत असलेल्या व्यापाऱ्याविरूद्ध विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार आली होती. त्यात दिघावकरांनी लक्ष घालताच व्यापाऱ्याला पैसे परत मिळवुन दिले.
व्हिक्टोरिया ग्लोबल ट्रेडींग एक्सीमचे संचालक अंजना मुखर्जी, कोलकत्ता या कांदा व्यापा-यास स्वस्तात कांदा देतो म्हणुन पंढरीनाथ भास्कर शिंदे यांनी साई ट्रेडर्सचे संचालक सुनिल भास्कर संधान, रा. टाकळी विंचुर, ता. निफाड यांच्या बँक खात्यात अर्जदाराकडुन ऑनलाईन २ लाखाची रक्कम घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी कांदा व घेतलेले पैसे परत देण्यास त्यांनी शिंदे यांनी टाळाटाळ केली.
या प्रकरणी व्यापारी मुखर्जी यांनी पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या कडे तक्रार केली संबधित व्यापाऱ्याने काही दिवसानंतर मुखर्जी यांना चेक दिले परंतु ते पण बाऊन्स झाले. त्यानंतर अर्जदार यांनी वेळोवेळी पैशाची मागणी करूनही पैसे देण्यास या व्यापाऱ्याने टाळाटाळ केली. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार मिळताच नाशिक ग्रामीण यांचे कार्यालयास फसवणुकी बाबतचा तकारी अर्ज दिला. सचिन पाटील पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांनी पुढील अर्ज चौकशीचे आदेश लासलगाव पोलीस ठाणे यांना दिल्यानंतर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड सोमनाथ तांबे व लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वाघ, सहा. पोलीस उप निरीक्षक देविदास वि. लाड यांनी अर्जदाराचे १ लाख ८० हजार रुपये अर्जदारास परत मिळवुन दिले.