अनकाई किल्ल्यावरील माकडे अन्न पाण्यासाठी गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:51 PM2020-03-19T13:51:54+5:302020-03-19T13:52:59+5:30
येवला:येवला तालुक्यातील अंकाई किल्ला व परिसरातील गावाभोवती माकडांचे कळप डोंगरात पाण्याची चणचण भासताच गावाकडे कूच करत आहे. वनविभागाने या प्राण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
वन विभाग दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे वनचर, सारखे वॉटर हॉल, वनराई बंधारे, दगडी बांध यासारखे पाणी अडवण्याचे उपक्र म राबवत असते. परंतु पूर्वी अिस्तत्वात असलेले वनराई बंधारे, नाला बांध आज गाळाने व्यापलेले आहे. त्यांची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात असतांनाही या मध्ये पाणी साठले जात नाही. हे वनराई बंधारे सपाट झाले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी अडवले जात नाही. या पाण्याची साठवण क्षमता कमी होत आहे. यामुळे उन्हाची लगबग सुरु होताच पाण्याची चणचण भासत आहे. यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे धाव घेत आहे. डोंगरात माकडं बरोबरच खोकड, ससा, मोर, रान डुक्कर, लांडगे यासारखे प्राणी डोंगरामध्ये अिस्तत्वात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न भेडसावत या वन्य प्राण्यांचे प्रचंड हाल होतात. शासनाच्या वतीने नेहमीच जलसंधारणाच्या बाबतीत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार सारख्या योजना राबवल्या जातात. परंतु वन विभागामार्फत कुठल्या हि प्रकारे अश्या धरनातील गाळ काढण्याच्या योजना राबविल्या जात नाही. कित्येक वर्षापासून ह्या धरणातील गाळ काढला गेला नाही. त्यामुळे आज वनराई बंधारे खेळाच्या मैदाना सारखे सपाट झाले आहे. डोंगरात असलेल्या पाण्याची साठवण क्षमता घटली आहे. त्यामुळे उन्हाळा सुरवात होताच पाणवठे कोरडे ठाक पडतात. आज छोट्या मोठ्या कुंड्या वन विभागाच्या मार्फत प्राण्यासाठी ठेवल्या जातात. परंतु तरीही प्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. पाण्यासाठी प्राण्याची हि फरफट थांबण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. कुत्रिम पाणवठे, वनतळे वनचर उभारणी करण्यापेक्षा आहे तेच पुनर्जीवित केले तरी प्राण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. गावांमध्ये वनसंवर्धन व वन्यप्राण्याच्या बाबतीत वन समतिी स्थापन केली जाते. परंतु प्राण्यांचे प्रश्न मार्गी लावणे त्याकडे दुर्लक्ष होते. प्राण्यांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत कोणीही पाठपुरावा करत नाही. वनविभागाने वनतळ्यातील गाळ काढण्यास परवानगी दिल्यास लोकसहभागातुन हा गाळ शेतकरी निक्कच काढतील. वनतळ्यातील साठवण क्षमता वाढेल. पाणीही दिर्घ काळ टिकेल. अशी प्रतिक्र ीया डॉं प्रितम वैद्य यांनी दिली. )