जिल्हाध्यक्ष संतोष डोमे, ओबीसी तालुकाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायतीपासून मोर्चाला सुरुवात झाली.
यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांनी सांगितले की, ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण असून, ते ३५ टक्के आरक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर ओबीसी तालुका अध्यक्ष डॉ. गोसावी यांनी सांगितले की, ओबीसी समाजाबरोबर मराठा समाजालापण आरक्षण देण्यात यावे.
यावेळी सोमनाथ सोनवणे, जगदीश सोनवणे, दुर्गेश चितोडे, अनिल गोवर्धने, हर्षल काठे, सोनू काठे, प्रवीण लहितकर, राजाभाऊ गोसावी, दत्ता ढाकणे, भगवान पगार, शांताराम पगार, बापू चव्हाण, राहुल मौले, गोकुळ ढाकणे, सचीन आव्हाड, निलेश मौले, तवसिफ मनियार, अशोक सोनवणे, सोमनाथ गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------
दिंडोरी येथे समता परिषदेतर्फे तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा. (०२ दिंडोरी २)
===Photopath===
021220\02nsk_13_02122020_13.jpg
===Caption===
दिंडोरी येथे समता परिषदेतर्फे तहसील कार्यलयावर काढण्यात आलेला मोर्चा. (०२ दिंडोरी २)