नाशिक जिल्ह्यात १५ हजारहून अधिकजण कोरोनामुक्त ; ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:35 PM2020-08-11T13:35:50+5:302020-08-11T13:40:28+5:30
नाशिक जिल्ह्यातील १५ हजार २८१ कोरोना बाधीतांवर उपचारानानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा सामान्य मंगळवारी (दि.11) प्राप्त अहवालानुसार देण्यात आली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील १५ हजार २८१ कोरोना बाधीतांवर उपचारानानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.तर आत्तापर्यंत ६२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य मंगळवारी प्राप्त अहवालानुसार देण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २९४, चांदवड ३५, सिन्नर २३४, दिंडोरी ५५, निफाड २१०, देवळा ७५, नांदगांव ७०, येवला १०, त्र्यंबकेश्वर ०६, सुरगाणा ११, पेठ ००, कळवण ०४, बागलाण ६०, इगतपुरी ४५, मालेगांव ग्रामीण ८५ असे एकूण ११९४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३०५ तर जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २० हजार ५५३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.४६, टक्के, नाशिक शहरात ७४.९९ टक्के, मालेगाव मध्ये ७५.५७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.०६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.५० इतके आहे. तर नाशिक ग्रामीण १५६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३५२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९१ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६२० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.