दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:43 AM2018-11-01T01:43:55+5:302018-11-01T01:44:14+5:30

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत बुधवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात सुमारे दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे.

 More than one and a half million new entrants | दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी

दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी

Next

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत बुधवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात सुमारे दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत काही केंद्रांवर मतदार नोंदणीचे अर्ज दाखल केले जात असल्यामुळे मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.  १ सप्टेंबरपासून देशपातळीवर विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यात जानेवारी २०१९ मध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाºया नवमतदारांची नोंदणी, दुबार व मयत मतदारांचे नाव कमी करणे, नाव, पत्त्यातील चुका दुरुस्त करणे, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे आदी कामे बीएलओंकरवी करून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून यासाठी मतदारसंघातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात निवडणूक नोंदणी अधिकाºयांना उद्दिष्टही देण्यात आल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून निवडणूक यंत्रणा जोमाला कामाला लागली आहे.
मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची माहिती गोळा करण्याबरोबरच नवीन मतदारांची नोंदही केली जात आहे. नाशिक जिल्ह्यासाठी आयोगाने अडीच लाख नवीन मतदारांचे उद्दिष्ट दिले असले तरी, प्रत्यक्षात बुधवारी ३१ आॅक्टोबर अखेर सुमारे दीड लाखाहून अधिक मतदारांची नोंदणी करण्यात आली.
मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यता
सुमारे २३ हजार मतदारांनी आॅनलाइन नोंदणी केली. बुधवारी सकाळी एक लाख २० हजार मतदारांची प्रत्यक्ष आॅनलाइन नोंदणी करण्यात आली तर सायंकाळपर्यंत सुमारे ३५ ते ४० हजार अर्ज विविध केंद्रांवर दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Web Title:  More than one and a half million new entrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.