नाशिक : सरकार स्थापन झाल्यानंतर देशात आणि राज्यात दुर्दैवाने कोरोनाची महामारी पसरली त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून त्यातून मार्ग काढत शासन जनतेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेत आहे. याच काळात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे सूक्ष्म नियोजन करत उपाययोजना करण्यात आल्याने राज्याच्या तुलनेत नाशिकचा मृत्युदर कमी करण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंलदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जयंत पाटील म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना हाती घेण्यात आली असून योजनेच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्'ातील कार्यकर्त्यांनी सजग रहावे. बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतांना नाशिक जिल्'ात तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविली जात आहे. त्यामुळे अनेक तरुणांना फायदा मिळत असल्याने समाधान आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष अभिप्राय योजनेला जिल्'ात चांगले यश मिळाले असून अनेक प्रश्न आपल्यापर्यंत आले आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पक्ष संघटना वाढविण्यासाठी सक्षमपणे काम करणारे लोक पुढे यायला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर लवकरच पुन्हा जिल्'ाचा दौरा करून नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बैठक घेऊ असे त्यांनी सांगितले.या बैठकीस यावेळी माजी आमदार हेमंत टकले, आमदार सरोज आहेर, माजी आमदार जयवंतराव जाधव, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, विश्वास ठाकूर, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, दिलीप खैरे, निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टिळे, अशोक सावंत, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गौवर्धने, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, यशवंत शिरसाठ, नगरसेवक गुरुमित बग्गा, जगदीश पवार, हरीश भडांगे, मधुकर मौले, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब मते, मनोहर कोरडे, संजय खैरनार,महेश भामरे, शंकर मोकळ, जीवन रायते, अनिल परदेशी, मोतीराम पिंगळे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.