मागबारी घाटातील उंचवटे धोकादायक
By Admin | Published: February 15, 2017 11:07 PM2017-02-15T23:07:59+5:302017-02-15T23:08:27+5:30
मागबारी घाटातील उंचवटे धोकादायक
खामखेडा : नामपूर-सटाणा- खामखेडा-कळवण-नाशिक राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील धावणाऱ्या वाहनांसाठी धोकादायक ठरलेला मांगबारी घाटातील माथ्यावरील उंचवटा कमी करण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे .
साक्र ी-नामपूर-सटाणा-खामखेडा -बेज-कळवण-नांदुरी-नाशिक हा राज्य महामार्ग सतराचा रस्ता असून, हा रस्ता नांदुरी गडावर व नाशिकला जाण्यासाठी भाविकांना जवळचा असल्याने या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून नोकरीनिमित्त मोठ्या प्रमाणात नोकरदार ये-जा करतात. या राज्य महामार्गावर पिंपळदर-खामखेडा गावाच्या दरम्यान मांगबारी घाट असून सदर मांगबारी घाटातील माथ्यावरील भाग आहे. या उंच भागामुळे घाटाचा चढावाचा रस्ता असल्याने येणारे वाहन जोरात असते. तर सटाण्याकडून येणारा रस्ता चढावाचा असल्याने खामखेड्याहून या मांगबारी घाटातून सटाण्याकडे येणारा रस्ता चढावाचा असल्याने समोरून येणारे वाहन उंच भाग असल्याने दिसत नाही, त्यामुळे अचानक दिसणाऱ्या वाहनांमुळे गोंधळ होऊन नेहमी अपघात होतात. घाटाचा रस्ता असल्याने खालून येणारे वाहन जोरात असते. त्याचप्रमाणे वरून येणारे वाहन उताराचा रस्ता असल्याने जोरात असते त्यामुळे अपघात होतात. आता सध्या रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण चालू आहे. तेव्हा सदर रस्त्यावरील मांगबारी घाटातील माथ्यावरील उंचवटा कमी करण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)