अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 10:28 PM2020-06-18T22:28:04+5:302020-06-19T00:25:44+5:30
मालेगाव : अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे नेतृत्वाखाली बीएड बीएड झालेल्या उमेदवारांनी धरणे आंदोलन करण्यात आले.
मालेगाव : अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे नेतृत्वाखाली बीएड बीएड झालेल्या उमेदवारांनी धरणे आंदोलन करण्यात आले.
आर्थिक कोंडीमुळे राज्य सरकारने राज्यात सरकारी नोकर भरतीवर बंदी घातली आहे. यामुळे शिक्षकांची भरती प्रक्रि याही बंद झाली आहे. शिक्षक भरती आण िशिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारी संघ, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने सरकारला या संदर्भात तीन निवेदने पाठविली होती. ज्यामध्ये त्यांनी सरकारकडे अशी मागणी केली की शिक्षक भरती सुरू करु न उर्दू , मराठी माध्यमाच्या उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे, सरकार भरती प्रक्रि येकडे दुर्लक्ष करीत आहे ज्यामुळे राज्यातील उमेदवारांमध्ये प्रचंड निराशा आहे. सरकारने 2017 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना भरतीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, दुसरी बुध्दिमत्ता चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राज्य अध्यक्ष महेबूब तांबोळी, राज्य उपाध्यक्ष अल्ताफ अहमद, नईम शाहीन, साजिद हमीद, अन्सारी युनूस यांनी केली आहे.