पांगारणेत आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 02:28 PM2019-03-09T14:28:35+5:302019-03-09T14:28:53+5:30

सुरगाणा : तालुक्यातील पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रूग्णवाहिका मिळावी यासह विविध मागण्यांसाठी येथील पंचायत समितीसमोर आदिवासी बांधवांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले.

Movement of dharnas of tribal brothers in Pangarane | पांगारणेत आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन

पांगारणेत आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन

Next

सुरगाणा : तालुक्यातील पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रूग्णवाहिका मिळावी यासह विविध मागण्यांसाठी येथील पंचायत समितीसमोर आदिवासी बांधवांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलन प्रसंगी भारतीय आदिवासी पॅँथरचे पदाधिकारी व ग्रा.पं.सदस्य तुळशिराम खोटरे यावेळी उपस्थित होते. आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांमधील भ्रष्टाचार, अनुदान वेळेवर न मिळणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या कित्येक महिन्यापासून रु ग्णवाहिका नाही, घरकुल, शौचालय, टीएसपी विहिरींची कामे पुर्ण होऊन देखील अनुदान मिळत नाही. त्याचप्रमाणे आदिवासी समाजामध्ये होणारी घुसखोरी, आदिवासी कसत असलेल्या वनजमिनींबाबत शासनाच्या भूमिकेला विरोध करून वनहक्क कायद्याची पारदर्शी अमलबजावणी करून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा. तसेच घरकुल योजनेचा लाभ सर्वसामान्य गरीब जनतेला मिळावा इत्यादी विविध मागण्यांबाबत हे धरणे आंदोलन असून सर्व मागण्या त्वरित पूर्ण करून आदिवासी बांधवांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी तुळशिराम खोटरे यांनी केली. यावेळी दलित पँथरचे पदाधिकारी कैलास सुर्यवंशी आदींसह परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित होते.

Web Title: Movement of dharnas of tribal brothers in Pangarane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक