दुधाच्या दरवाढीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 03:16 PM2020-08-01T15:16:17+5:302020-08-01T15:17:20+5:30

वणी : दुध दरात वाढ करावी तसेच दुधाच्या पावडरची निर्यात बंद करु न दुध उत्पादक यांना न्याय द्यावा यासाठी वणी बसस्थानकाबाहेर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Movement for milk price hike | दुधाच्या दरवाढीसाठी आंदोलन

दुधाच्या दरवाढीसाठी आंदोलन

Next
ठळक मुद्दे दगडावर प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करु न निषेध नोंदविला.

वणी : दुध दरात वाढ करावी तसेच दुधाच्या पावडरची निर्यात बंद करु न दुध उत्पादक यांना न्याय द्यावा यासाठी वणी बसस्थानकाबाहेर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
शेतकरी वर्गाचा जोड व्यवसाय म्हणुन दुध उत्पादन व त्याची विक्र ी असा असुन दुध विक्र ी च्या माध्यमातुन आलेल्या उत्पन्नावर खर्चाच्या वजाबाकीचे गणति अवलंबुन असते तसेच काही दुध उत्पादकही या प्रमुख व्यवसायात आहेत. दरम्यान कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे.
बहुतांशी नागरिकांना कुटु:बाचा उदरिनर्वाहाची समस्या आहे. त्यात उत्पन्न नाही. कृषीउत्पादीत वस्तुना भाव नाही त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासुन दुध उत्पादकांची परवड सुरु आहे. दुध दर व उत्पादनाच्या खर्चाचा ताळमेळ बसेनासा झाला आहे त्यामुळे उत्पादक अस्वस्थ झाले आहेत. उत्पादकांच्या भावनाची दखल घेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केले.
दुध उत्पादकांना प्रती लीटर दहा रु पये अनुदान द्यावे दुधाच्या पावडरची व दुधाची निर्यात बंद करावी दुध उत्पादकांना न्याय द्यावा अशा प्रमुख मागण्या करु न दगडावर प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करु न निषेध नोंदविला. या आंदोलनास पक्षाचे कार्यकर्ते व महीलावर्गाची उल्लेखनीय उपस्थीती होती. (फोटो ०१ वणी, ०१)

Web Title: Movement for milk price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.