उमराणे : गेल्या चार पाच दिवसांपासून सुरु असलेल्या रिपरिप पावसामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी कांदा विक्र ीसाठी आलेल्या शेतकर्यांसह व्यापारी वर्गाला लिलाव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रोखीचा अर्थव्यवहार व उत्तम दर्जाचा भाव आदी कारणांमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कसमादेनां पट्ट्यातील बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्र ीसाठी येतात. परंतु बाजार समितीने घेतलेल्या नविन जागेवरचेकॉक्र ीटीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडल्याने मुख्य आवारात असलेल्या अल्प जागेवर कांदा लिलाव केला जातो.परंतु येथेही कॉक्र ीटीकरण नसल्याने अल्पशा पावसातही मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने वाहन धारकांना वाहने लावण्यासाठी तसेच कांदा मालाचा लिलाव करण्यासाठी व्यापारी वर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय जास्त चिखल झाल्यास बाजार समितीलगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यावर जीव धोक्यात घालून लिलाव करावा लागत असल्याने किमान मुख्य आवारात मुरूम टाकण्यात यावा अशी मागणी कांदा विक्र ीस आलेल्या शेतकऱ्यांंकडुन केली जात आहे.
उमराणे बाजार समितीत चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 2:54 PM