मुक्तिधाम आवार पड़ले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:16 PM2020-09-22T23:16:30+5:302020-09-23T00:56:10+5:30
नाशिक : सकाळ पासून सायंकाळ पर्यंत नेहमीच गजबज असलेला नाशिकरोड येथील मुक्तिधामचे आवार ओस पड़ले असून येथील व्यवसायिकांचे व्यावसाय बंद झाले आहेत ते पुन्हा केव्हा सुरु होतील याचा कोणताही अंदाज व्यवसायिकाना नाही .
नाशिक : सकाळ पासून सायंकाळ पर्यंत नेहमीच गजबज असलेला नाशिकरोड येथील मुक्तिधामचे आवार ओस पड़ले असून येथील व्यवसायिकांचे व्यावसाय बंद झाले आहेत ते पुन्हा केव्हा सुरु होतील याचा कोणताही अंदाज व्यवसायिकाना नाही .
नाशिक रोडची देशभरात वेगळी ओळख निर्माण करणारे मुक्तिधाम प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे . देशभरतील भाविकांचा येथे नेहमी राबता असतो यामुळे सकाळ पासून सायंकाल पर्यंत मुक्तिधामचे अवार चेतन्याने भारलेले असते . सकाळ पासुनच ग्राहकांची चहल पहल असलेल्या या परिसरातील दुकान सकाळ पासुनच सुरु होतात ती रात्री 9 पर्यंत सुरु असायची कोरोनामुळे मार्च महिन्यात शासनाने देशभरात लॉकडाउन जाहिर केल्यानंतर सर्व धार्मिक स्थळ बंद करण्यात आली . मुक्तिधामहि त्याला अपवाद ठरले नाही . संचारबन्दीमुळे भविकांची संख्या रोडवली मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारच बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकन्हि आत मध्ये जाता येत नाही . हक्काचा ग्राहक येणे बंद झाल्यामुळे येथील व्यवसायिक अडचणीत आले आहेत . आज मुक्तिधामचे सर्व अवार सुने सुने झाले असून एकही दुकान सुरु नाही . भविकांची वर्दळ नाही . यामुळे संपूर्ण अवार ओस पड़ले आहे . धार्मिक स्थळ खुली करण्याची मागणी होत असली तरी शासनाने अद्याप त्याला परवानगी दिली नाही . ती केव्हा मिळेल याचा कोणताही अंदाज नसल्याने व्यवसायिकाना दुकाने बंद ठेवन्याशीवाय पर्याय नाही मागील सहा महिन्यापासुन दुकान बंद असल्यामुळे या व्यवसायिकाना विविध आडणीचा सामना करवा लागत आहे