नाशिक : मानवी चुका टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेली अॅटो डीसीआर यंत्रणा प्रारंभीच्या सहा महिन्यांतच धापा टाकत असून, त्यामुळे विकासक तसेच वास्तुविशारद वैतागले आहेत. तांत्रिक दोष दूर होत नसल्याने त्यांना आॅफलाइनच प्रस्ताव सादर करावे लागत असून, आता अॅटो डिसीआर चालविणाºया कंपनीला आठ दिवसांची डेडलाइन देण्यात आली असून, त्यानंतर कंपनीलाच थेट नोटीस बजावण्यात येणार आहे. नगररचनातील कामकाज पारदर्शी आणि सुलभ करण्याच्या नावाखाली अॅटो डीसीआरची यंत्रणा राबविण्यात येत आहे. सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेल्या प्रणालीच्या माध्यमातून बांधकाम आराखडे सादर करताना अनेक अडचणी येत असल्याने विकासकांना आॅनलाइन आणि आॅफलाइन अशा दोन वेळा प्रस्ताव सादर करावे लागत आहेत. त्यामुळे अॅटो डीसीआर निर्धोक करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्याचा निर्णय शुक्रवारी नगररचना विभागाचे अधिकारी आणि विकासक तसेच वास्तुविशारदांच्या बैठकीत देण्यात आला. यासंदर्भात क्रेडाई, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन, असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरने महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे समन्वय समिती स्थापन केली होती. तसेच कंपनीच्या अधिकाºयांनाही पाचारण केले होते. त्यानुसार कंपनीचे अधिकारी भीमसेन मिश्रा यांच्या उपस्थितीत शुक्र वारी नगररचना विभागाचे अधिकारी आणि विकासक तसेच वास्तुविशारदांची बैठक झाली. यावेळी क्रे डाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी विविध अडचणी मांडल्या. यावेळी आठ दिवसांत त्रुटी दूर झाल्या नाहीत तर पुन्हा आॅफलाइन काम सुरू करण्याची मागणी संघटनांनी केली असून, त्यावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आॅटो डीसीआर प्रणालीची वाटचाल पुन्हा आॅफलाइनकडे जाण्याची शक्यता आहे.
महापालिका : नगररचना विभागाची विकासकांसोबत बैठक अॅटो डीसीआर दुरुस्तीसाठी डेडलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:49 AM
नाशिक : मानवी चुका टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेली अॅटो डीसीआर यंत्रणा प्रारंभीच्या सहा महिन्यांतच धापा टाकत असून, त्यामुळे विकासक तसेच वास्तुविशारद वैतागले आहेत.
ठळक मुद्देकंपनीला आठ दिवसांची डेडलाइनडीसीआर प्रणालीची वाटचाल आॅफलाइनकडे