वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:59 AM2020-01-14T00:59:53+5:302020-01-14T01:02:45+5:30
नाशिक : निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना घडतात. २०१९ साली डिसेंबरअखेरपर्यंत १५० पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्यात मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, मात्र यापैकी बहुतांश पक्षी जायबंदी झाले तर काहींचा मृत्यूही झाला. तसेच काही पक्ष्यांनी हवेत पुन्हा भरारीदेखील घेतली. वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंगबाजीचा आनंद लुटला जातो. हा आनंद लुटताना नायलॉन मांजाचा वापर टाळला तर दुर्घटनादेखील कमी होण्यास मदत होईल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासन, वनविभाग, पोलीस प्रशासनाकडून सातत्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नायलॉन मांजाचा वापर, विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील काही पक्षीप्रेमींशी संपर्क साधला वर्षभरात नायलॉन मांजाने कापले १५० पक्ष्यांचे पंखधक्कादायक : बहुसंख्य जायबंदी झालेले पक्षी पडले मृत्युमुखी; झाडावरील मांजात अडकून सर्वाधिक दुर्घटनाअसता त्यांनी सांगितले की, दरवर्षी मकरसंक्रांतीनंतर जखमी पक्ष्यांचे रेस्क्यू कॉलची संख्या खूप वाढते. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही डिसेंबरपासूनच असे कॉल शहरातील पक्षीप्रेमींना येण्यास सुरुवात झाली होती. २०१८ साली सुमारे ७२ पक्ष्यांना जीव गमवावा लागला होता तर २०१९ साली जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ८० पक्षी मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे.
चला ‘त्यांची’ही संक्रांत गोड करूया...
मकरसंक्रांतीनिमित्त एकमेकांना तीळगूळ वाटप करत ‘गोड बोला’ असे सांगितले जाते, मात्र मकरसंक्रांत यावर्षी तरी पक्ष्यांसाठी ‘गोड’ ठरावी, यासाठी आपण मनुष्य म्हणून काही जबाबदारी पार पाडणार आहोत का? असा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. कारण दरवर्षी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत वर्षभर विविध झाडांवर नायलॉन मांजाच्या जाळ्यात पक्षी अडकून जायबंदी होतात अन् मृत्युमुखीही पडतात. दरवर्षी हा आकडा वाढतच चालला आहे. चालू २०२० वर्षात तरी पक्ष्यांवर ओढावणारे संकट दूर करण्यासाठी नायलॉन मांजावर बहिष्कार टाकूया.. इको फ्रेण्डली संक्रांत साजरी करूया..