सटाण्यात शेतमजुराचा डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 11:25 PM2022-04-03T23:25:54+5:302022-04-03T23:26:54+5:30

सटाणा : शहरापासून हाकेच्या अंतरावरील कंधाणा फाट्याजवळील हॉटेलच्या पाठीमागे एका युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली आहे. घमाजी रंगनाथ माळी (वय ४०), रा. पिंगळवाडे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder by throwing a stone at the head of a farm laborer in Satana | सटाण्यात शेतमजुराचा डोक्यात दगड घालून खून

सटाण्यात शेतमजुराचा डोक्यात दगड घालून खून

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

सटाणा : शहरापासून हाकेच्या अंतरावरील कंधाणा फाट्याजवळील हॉटेलच्या पाठीमागे एका युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली आहे. घमाजी रंगनाथ माळी (वय ४०), रा. पिंगळवाडे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोरेनगर शिवारातील शेतकरी सुदर्शन सोनवणे यांच्या शेतात शेत मजूर म्हणून काम करीत असलेला घमाजी रंगनाथ माळी हा शनिवारी (दि.३) बाजार करण्यासाठी घराबाहेर गेला असता रात्री उशीर झाला तरी पती न आल्यामुळे पत्नीने त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून आला नाही.

रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंधाणा फाट्याजवळील हॉटेल गुरुप्रसादच्या पाठीमागे मोकळ्या जागेत घमाजी माळी याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून अतिशय निर्घृणपणे त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवलदार हेमंत कदम, जिजाभाऊ पवार, अजय महाजन, भास्कर बस्ते, प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी धाव घेत तपासी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले.

पोलिसांकडून तपास सुरू
मयत घमाजी माळी हा शनिवारी रात्री कोणासोबत होता, काही वादातून अथवा पूर्व वैमनस्यातून त्याला मारण्यात आले. त्याची ओळख पटू नये म्हणून त्याला मारल्यानंतर दगडाने चेहेरा ठेचला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत. सटाणा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून सायंकाळी घमाजी माळी याच्यावर पिंगळवाडे, ता. बागलाण येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

 

 

Web Title: Murder by throwing a stone at the head of a farm laborer in Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.