महिला पोलिसाच्या खुनाच्या गुन्ह्यात परमवीर सिंग यांनीच अडकवले, पोलीस उपअधीक्षक निपुंगे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 08:14 AM2021-07-06T08:14:58+5:302021-07-06T08:18:16+5:30
ठाणे जिल्ह्यात २०१७ मध्ये निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यात निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली होती.
नाशिक: वाहतूक विभागातील गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे दुखावलेले तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीच मला सुभद्रा पवार या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात अडकविल्याचा आरोप पोलीस उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. या प्रकरणी त्यांनी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात १४ जून रोजी फिर्याद दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात २०१७ मध्ये निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यात निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली होती. याबाबत निपुंगे म्हणाले, सुभद्राची हत्या तिचा प्रियकर अमोल फफाळे याने केली हे उघड झाले. सुभद्रा हत्या प्रकरणात माझा थेट संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
तत्कालीन आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुक्तार अली बागवान, अमोल फफाळे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीसह कट रचणे व इतर कलमांनुसार श्यामकुमार निपुंगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात २२ पानी तक्रार केली आहे.