कळवणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार

By Admin | Published: July 10, 2016 09:57 PM2016-07-10T21:57:01+5:302016-07-10T22:04:15+5:30

१२५ मिमी : पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Mushaladar is on the west side of Kalvan | कळवणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार

कळवणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार

googlenewsNext

कळवण : कळवण शहर व तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी कळवण तालुक्यात १२५ मिमी पाऊस पडला असून दळवट, अभोणा व कनाशी परिमंडळात सर्वाधिक पाऊस पडला असून कळवण, मोकभणगी, नवी बेज या परिमंडळात कमी प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद पर्जन्यमान मापकावर असून रविवारी तालुक्यात दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. सरासरी १५० मिमी पाऊस पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कळवण शहरासह तालुक्यात शनिवार व रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले असून बांध फुटले आहे तर रस्ते उखडून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत.
रविवारी (दि.१०) लग्नतिथी असल्याने कळवण शहर व तालुक्यात लग्नकार्य संयोजकांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. सलग दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले होते. आजच्या लग्नतिथीमुळे शहरातील मंगल कार्यालय व लॉन्स परिसरातील रस्त्यावर पावसामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने अनेक मान्यवरांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला.
कळवण, अभोणा, कनाशी, दळवट, जयदर, पाळे, नवी बेज, जुनी बेज, भेंडी, शिरसमणी, ओतूर, कुंडाणे, भुसणी, जिरवाडे, बापखेडा, विरशेत, कुमसाडी, भांडणे, शिंगाशी, वरखेडा, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, मोकभणगी, दरेभणगी, खेडगाव, दह्याणे दिगर, खिराड, देसराणे, धनेर, गणोरे, गोबापूर, नांदुरी, कळमथे, निवाणे, नाकोडे, मानूर, शिरसमणी आदि तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून तालुक्यात पावसाची दिवसभर रिमझिम सुरू होती. आदिवासी पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प तसेच धनोली, भेगू, मळगाव चिंचपाडा, जामलेवणी, गोबापूर, मार्कंडपिंप्री, खिराड येथील लघुजलसंचयाची पाणी पातळी वाढत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. केवळ ढगाळ वातावरण होते. मात्र, शनिवार सकाळपासून कळवण तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सात वाजेपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. कळवण तालुक्यात शनिवारी मंडळनिहाय पडलेला पाऊस- कळवण-२५.०, नवी बेज- १३.०, अभोणा- ५६.०, कनाशी- ५९.४, दळवट- ५७.८, मोकभणगी- १२.० तालुक्यात पर्जन्यमापकांच्या सहा परिमंडळात असलेल्या यंत्रकाच्या सूचीवरून एकूण ५४३ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून सरासरी १२५ मिमी पाऊस पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Mushaladar is on the west side of Kalvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.