़़़अन् माय^-लेकरांची शिवरेत झाली पुनर्भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:07 AM2018-03-12T00:07:12+5:302018-03-12T00:07:12+5:30
निफाड : मनुष्य असो की प्राणी या दोन्ही घटकांमध्ये आई आणि लेकरू या नात्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. आपले लेकरू थोडेसे दृष्टीआड झाले की आई मग कोणतीही असो, ती कासावीसच होते. तेच लेकरू नजरेस पडते तेव्हा ती त्याला कुशीत घेते, मायेने कुरवाळते. माय-लेकराची होणारी भेट हा अवर्णनीय असा मेळ असतो. यास प्राणीजातही अपवाद नसते. बारा तासाहून अधिक काळ ताटातूट झालेल्या बिबट्याची मादी व दोन बछड्यांची भेट येवला वनविभागाच्या वनाधिकाºयांनी शनिवारी रात्री घडवून आणली.

निफाड तालुक्यातील शिवरे येथील सुनील बाळासाहेब सानप यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना शनिवारी दुपारी १ वाजता दोन बछडे ऊसतोड कामगारांना दिसून आले. त्यांनी ही घटना येवला वनविभागाला कळविली. येवला वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी बछडे ताब्यात घेतले. दोन्ही बछडे एक महिन्याचे आहेत. येवला वनविभागाचे वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम. एम. राठोड , आव्हाड, वनरक्षक विजय टेकनर, भैय्या शेख, रामनाथ भोरकडे, रामचंद्र गंडे आदींच्या पथकाने या बछड्यांच्या आईला पिंजºयात जेरबंद करण्यापेक्षा सानप यांच्या शेतात घटनास्थळी कॅरेटमध्ये दोन्ही बछडे ठेवून आईच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. बछडे तिच्या ताब्यात मिळाल्यास ती हिंसक होणार नाही हा उद्देश त्यामागे होता. त्यानुसार शनिवारी रात्री बछडे एका कॅरेटमध्ये ठेऊन त्यावर एक कॅरेट ठेवण्यात आले. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास बछडे ठेवलेल्या कॅरेटजवळ ती मादी आली. तिने आधी कॅरेटजवळ जाऊन वरील कॅरेट पाडले. तिचे वात्सल्य जागे झाले . मायेने बछड्यांना जवळ घेतले व काही वेळाने दोन्ही बछड्यांना घेऊन ती घटनास्थळावरून निघून गेली. ते दृश्य पाहून वनाधिकाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.निफाड तालुक्यात दुसरा प्रयोग यशस्वीअशा पद्धतीचा प्रयोग जुन्नर तालुक्यात वनविभाग राबवत आहे. हा जुन्नर फॉर्म्युला निफाड तालुक्यात दुसºयांदा यशस्वी झाला आहे. मागील वर्षी येवला वनविभागाने निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे अशाच पद्धतीने बछडे आईच्या ताब्यात दिले होते. वनविभागाच्या या प्रयोगाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.