नायगाव-पिंपळगाव निपाणी रस्त्याची मोठी दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 07:36 PM2019-11-27T19:36:42+5:302019-11-27T19:37:43+5:30

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या नायगाव-पिंपळगाव निपाणी या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

 Naigaon-Pimpalgaon Nipani road is in great shape | नायगाव-पिंपळगाव निपाणी रस्त्याची मोठी दुरवस्था

नायगाव-पिंपळगाव निपाणी रस्त्याची मोठी दुरवस्था

Next
ठळक मुद्देवाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या नायगाव-पिंपळगाव निपाणी या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडल्या जाणाºया नायगाव-पिंपळगाव या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. पिंपळगाव, तळवाडे, महाजनपुर, भेंडाळी, म्हाळसाकोरे, खानगाव, मांजरगाव आदी गावातील लोकांना नायगाव व नाशिक येथे जाण्यासाठी हा कमी अंतराचा रस्ता आहे.
त्यामुळे या रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. हा संपूर्ण डांबरीकरण झालेला रस्ता असुन गेल्या अनेक वर्षांपासुन संबंधित विभागाने हद्दीच्या वादावरून डागडुजी केलेली नाही. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता आता माती व खडीने व्यापला आहे. परिणामी वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
संपूर्ण रस्त्यावर उघड्या पडलेल्या खडीमुळे वाहने नादुरस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नाही. त्यामुळे प्रवास करतांना चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा महत्वाच्या रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी.
- सुनिल कातकाडे, पिंपळगाव.
दोन तालुक्यांना जोडणाºया रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तालुक्यातील शेवटचे गाव असल्याने हेतु पुरस्कर दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळुनही काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
- डॉ. आर. आर. बोडके, पिंपळगाव.
 

Web Title:  Naigaon-Pimpalgaon Nipani road is in great shape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.