निकवेल : येथे गेल्या दोन दिवसांपासून वानराचे आगमन झाले आहे. सदर वानर गावातील घरांवर, मंदिरावर तसेच झाडांवर उड्या मारून धुमाकूळ घालत असल्याने वानराचा धुमाकूळ बघण्यासाठी गावातील लहानांनी व ग्रामस्थांनी वानर आल्याचा आनंद लुटला. सदर वानर हे घरांच्या छतावर, गल्ली-बोळामध्ये जात असताना अनेक ग्रामस्थांनी त्याला खाद्यपदार्थ, पोळ्या, केळी, भुईमुगाच्या शेंगा आदि खाद्यपदार्थ त्याला देण्यात आले. वानरानेही या भोजनाचा स्वाद घेतला.दुसऱ्या दिवशी वानर जेव्हा गावामधून उड्या घेत होते तेव्हा उडी मारत असताना त्याच्या पायाला दुखापत झाल्याने दिसून आले. त्याने सकाळी दोन ते तीन तास गावामध्ये लहान मुले तसेच गावातील ग्रामस्थांची करमणूकच केली होती. त्यानंतर दुपारी निकवेल गावातून वानर दुसऱ्या गावाच्या दिशेने गेल्याने लहान मुलांचा व ग्रामस्थांचा हिरमोड झाला.तसेच वनविभागातील कर्मचाऱ्यांनी जखमी वानराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. त्यावर उपचार करण्यात यावे, अशी मागणी बागलाण पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, रमेश वाघ आदि ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
निकवेल येथरे वानराचा धुमाकूळ
By admin | Published: August 30, 2016 12:03 AM