नांदगावचे रेल्वे फाटक सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:34 PM2020-06-18T12:34:01+5:302020-06-18T12:34:08+5:30
नांदगांव : शहरातील रेल्वे फाटक दि. १८ जुन पासून बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होणार होती. याबाबचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेत फाटक सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

शहरातील रेल्वे गेटला पर्यायी मार्गाचे सुरु असलेले काम अद्याप पूर्ण झालेले नसतांना शहरातील रेल्वे गेट १८ जुन पासुन कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याबाबतची नोटीस रेल्वे अधिकार्यांमार्फत गेट वर लावण्यात आली होती. रेल्वे गेट बंद झाल्यास शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना शहरातील गेट पलीकडील १०० फुटावरील अंतरावर जाण्यासाठी साधारणत: दोन ते अडीच किलोमीटर लांबुन जावे लागणार होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याने नागरिकांनी रेल्वे गेट बंद करण्यास विरोध दर्शविला होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार सुहास कांदे यांनी रेल्वेच्या भुसावळ विभागाचे सेक्शन इंजिनिअर केदारे व नांदगांव रेल्वे स्टेशन प्रबंधक विश्वजित मीना यांचेशी फोनवर चर्चा करून पर्यायी मार्गाचे काम पुर्ण होई पर्यंत रेल्वे गेट सुरु ठेवण्याबाबत सुचना केल्या. तसेच शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, शहर प्रमुख सुनिल जाधव, प्रमोद भाबड व सागर हिरे यांनाही आमदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेवून चर्चा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे आता पर्यायी मार्गाचे काम पुर्ण होईपर्यंत रेल्वे गेट सुरु राहणार आहे.