नांदगाव विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:51 PM2020-03-02T23:51:08+5:302020-03-02T23:52:28+5:30

नांदगाव : सहा महिन्यांपूर्वीच साडेतीन लाख रुपये खर्चून रंग दिलेल्या नांदगावच्या शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा बावीस हजार रुपयांच्या थकीत बिलासाठी खंडित करण्यात आला आहे.

Nandgaon restroom power supply disconnected | नांदगाव विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित

नांदगाव विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित

Next
ठळक मुद्देकनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले

नांदगाव : सहा महिन्यांपूर्वीच साडेतीन लाख रुपये खर्चून रंग दिलेल्या नांदगावच्या शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा बावीस हजार रुपयांच्या थकीत बिलासाठी खंडित करण्यात आला आहे.
गेले दोन महिने विश्रामगृह अंधारात आहे. महावितरणचे कर्मचारी मीटर काढून घेण्यासाठी वारंवार चकरा मारत आहेत. त्यांना लवकरच बिल भरू, असे सांगताना कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत.
नाशिक व इतर ठिकाणांहून लेखा-परीक्षणासाठी आलेले अधिकारी, महसूल व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासाठी विश्रामगृह आरक्षित करण्यात येत असते. परंतु वीजच गायब असल्याने पाण्याची परवड झाली आहे. रात्री डासांच्या झुंडी येथे घोंगावत असतात. जिल्हा परिषदेच्या सादिल निधीतून वीजबिल भरण्यात येते हा निधीच काही महिन्यांपासून आलेला नाही. लाखो रुपये खर्चून विश्रामगृह फक्त दिवसाच्या उपयोगाचे झाले आहे. आता उन्हाळा सुरू झाला असल्याने दिवसासुद्धा पंखे सुरू होत नाहीत. उष्णतेमुळे रूममध्ये बसणे असह्य होत असल्याने अधिकारीवर्गही तिकडे पाठ फिरवत आहे. चुकून कोणी आलेच तर बाहेर झाडांखाली बसून वेळ निभावून नेत आहेत.

Web Title: Nandgaon restroom power supply disconnected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.