नांदूरशिंगोटे : चालकाने दाखविले प्रसंगावधान; धावती कार बेचिराख वावी रस्त्यावर ‘द बर्निंग कार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:42 PM2017-12-10T23:42:24+5:302017-12-10T23:45:40+5:30

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील मºहळ शिवारात शनिवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या दरम्यान नांदूरशिंगोटेकडे येणाºया स्कोडा कारने पेट घेतला.

Nandurashrote: Disaster shown by the driver; The Burning Car on the Runaway Car Beiricha Wavi Street! | नांदूरशिंगोटे : चालकाने दाखविले प्रसंगावधान; धावती कार बेचिराख वावी रस्त्यावर ‘द बर्निंग कार’!

नांदूरशिंगोटे : चालकाने दाखविले प्रसंगावधान; धावती कार बेचिराख वावी रस्त्यावर ‘द बर्निंग कार’!

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील मºहळ शिवारात शनिवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या दरम्यान नांदूरशिंगोटेकडे येणाºया स्कोडा कारने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतून तिघेजण सुखरूप बाहेर पडले. अवघ्या काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.
नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील मºहळ बुद्रुक शिवारात निरजंन कुºहे यांच्या वस्तीसमोर हा प्रकार मध्यरात्री घडला. नाशिक येथील उपनगर येथे राहणारे पराग सुभाष सानप (१९) हे आपले मित्र किरण हरिभाऊ जगझाप व सुशांत दिनकर काकड यांच्यासह स्कोडा लोरा कार क्र मांक एमएच ०४ बीएम ६३६३ हिने शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. शिर्डी येथील देवदर्शन आटोपून वावी मार्गाने नांदूरशिंगोटे येथे येत होते. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास चालक किरण जगझाप मºहळ शिवारात आले असता डेस्क बोर्डावरील मीटरचे काटे फिरत नाही तसेच सेंसरचा आवाज येत असल्याचे लक्षात आले व बोनेटमधून धूर दिसू लागताच इतर दोघामित्रांना सांगून कार रस्त्याच्या कडेला उभी करून तिघेही बाहेर पडले. जवळपास असणाºया नागरिकांना मदतीसाठी आवाज दिला. शेजारच्या वस्तीवरून पाण्याचे पिंप आणेपर्यंत काही क्षणातच कारचा भडका झाला. सानप यांच्यासमोर कार खाक होत होती. रात्रीची वेळ असल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. वेळेत कारच्या बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. अवघ्या काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली.
रात्री : दोन वाजेच्या सुमारास मदतकार्य
यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूला असणारे नागरिक जागे झाले व त्यावेळी त्यांना नागरिकांनी धीर दिला. सानप यांनी नांदूरशिंगोटे येथील नातेवाईक तुषार शरद सानप यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपक बर्के, संदीप भाबड, विश्वास भाबड यांच्यासह मºहळ येथे पोहोचले. रात्री दोन वाजेच्या सुमारास तिघेही नांदूरशिंगोटे येथे आले. पराग सानप यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात रविवारी अकस्मात जळतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nandurashrote: Disaster shown by the driver; The Burning Car on the Runaway Car Beiricha Wavi Street!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात