लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.पुढील आवर्तन साधारण एक महिन्यानंतर मिळणार असल्याने मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आत्तापासून केले, तरच जूनच्या अखेरीसपर्यंत पाणी पुरेल, मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे गरजेचे आहे.निफाड तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून नांदूरमध्यमेश्वरची ओळख आहे. या धरणातून लासलगाव सह १६ गाव पाणी योजना, म्हाळसाकोरे १२ गाव पाणी योजना तसेच विंचूर औद्योगिक वसाहतीसाठी व शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा केला जातो.येथील ग्रामीण भागातील जनतेला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती सर्वत्रच दिसते. तालुक्यात दोन-तीन वर्षांपासून जलसंधारण अभियान सुरु आहे. यात जलयुक्त शिवार, शेततळी निर्माण करण्यात आली आहेत. तर बंधारे, नदी, कालवा, तलाव आदी ठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढण्यासाठी दरवर्षी जोरदार उपक्र म राबविले जातात. मात्र या अभियानापेक्षाही सद्यस्थितीत धरणातील पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे.यंदा होळीच्या आधीपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली होती. पारा ३५ अंशाच्या वर चढल्याने गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकत आहे त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी घटणार यात शंका नाही. यंदा ही स्थिती उद्भवू नये यासाठी सगळ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे.आवर्तनाचे नियोजन हवेउन्हाळा वाढला की शेतकरी शेतीसाठी आवर्तनाची मागणी करू लागतात व प्रशासनावर दबाब आणतात. त्यामुळे प्रशासनही पाणी सोडते. पण, पाणी सोडताना ते किती प्रमाणात आणि कसे सोडले पाहिजे याचे नियोजन हवे. नाहीतर शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी मात्र वणवण, अशी स्थिती दरवर्षी पहावयास मिळते. ती यंदा होऊ नये यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे.(फोटो १३ लासलगाव, १३ लासलगाव १)
नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 6:49 PM
लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
ठळक मुद्देलासलगाव : टंचाईमुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन