नांदूरवैद्य पायी दिंडीचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:53 PM2019-01-29T18:53:54+5:302019-01-29T18:54:41+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथील पायी दिंडीचे त्र्यंबकेश्वरकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरि च्या जयघोष तसेच टाळमृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वर येथे संत निवत्तीनाथांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे मंगळवारी सकाळी प्रस्थान झाले.

यावर्षीही संत निवृत्तीनाथ महाराज यांचा रथ फुलांनी सजवण्यात आला होता. या रथामध्ये पांडुरंगाची प्रतिमा तसेच संत ज्ञानेश्वर महाराज व संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या ठेवलेल्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर पायी दिंडीची गावातुन फेरी काढत टाळमृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करण्यात आले. यावर्षी देखील नांदूरवैद्य परिसरात अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. थंडीच्या कडाक्यातही विठ्ठल नामाचा गजर करीत वारकरी दिंड्यांमध्ये सामील झाले आहे. दोन दिवसांमध्ये दहा ते पंधरा दिंड्यांचा मुक्काम नांदूरवैद्य येथे झाला. महाप्रसाद झाल्यानंतर हरिपाठ, भजन, कीर्तनाने रात्रभर जागर करीत भाविकांची हरिनामाचा जप करीत होते. पहाटे काकड आरती नंतर त्र्यंबकेश्वरकडे पालख्यांचे प्रस्थान झाले. या पायी दिंडीमध्ये नामदेव महाराज डोळस, अतुल महाराज तांबे, सखाहारी महाराज काजळे, माजी सैनिक तुकाराम काजळे, माजी सैनिक कुंडलिक मुसळे आदींसह असंख्य ग्रामस्थ वारकरी सहभागी झाले होते.